लोकशाही वाचवण्यासाठी रवींद्र धंगेकर यांना विजयी करण्याचा वकिलांचा निर्धार


                   


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : देशात लोकशाही संपवण्यासाठी सर्व प्रयत्न होत असून भाजपा देशाला हुकूमशाहीकडे नेत आहे.  भ्रष्टाचारी लोकांना वाशिंग मशीन मध्ये टाकून स्वच्छ करण्याचा वाव ते  आणत आहे, हे सामान्य जनता कदापिही खपवून घेणार नाही. लोकशाही वाचवण्यासाठी व सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी इंडिया आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना संसदेत पाठवण्याचा  आवाहन माजी खासदार ऍड. वंदना चव्हाण यांनी केले. तळागाळातील जनतेने त्यांना पाठींबा दिला असून  वकिलांनी देखील पाठींबा देऊन त्यांचा विजय निश्चित केला आहे, असा विश्वास वंदना चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.


स्वातंत्र्य लढ्यात वकिलांचे मोठे योगदान होते. आता हे स्वातंत्र्य भाजपा हिरावू पाहत आहे हा त्यांचा डाव कदापिही यशस्वी होणार नाही.  जनता भाजपाला घराचा रस्ता दाखवून देणार आहे असेही यावेळी ऍड. वंदना चव्हाण यांनी नमूद केले.

   पूणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी शुक्रवारी शिवाजी नगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील विविध विभागाला भेटी दिल्या. या वेळी वकिलांनी धंगेकर यांना पाठिंबा जाहीर करून लोकशाही जिवंत ठेवणारा उमेदवार आम्ही संसदेत पाठवणार असल्याची ग्वाही वकिलांनी दिली. निवृत्त माजी न्यायाधीश बी.जी. कोळसे पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऍड. अभय छाजेड, माजी खासदार ऍड. वंदना चव्हाण यावेळी उपस्थित होते. 

   काँग्रेस लीगल सेल, राष्ट्रवादी लिगल सेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीने जिल्हा व सत्र न्यायालयात धंगेकर यांचा सत्कार करण्यात आला.  

काँग्रेस लीगल सेलचे अध्यक्ष ऍड. राहुल ढाले, ऍड.विभा सिंग, ऍड. राशिदा सय्यद, अंजू डिसूजा, संजय साळवी, अश्विनी गवारे, अलका कडलक, फय्याज शेख, राजेंद्र शिंदे, अमोल नलगे, रवींद्र शिंदे, रेश्मा शिकलगार, मोहन वाडेकर, चंद्रशेखर जाधव, विठ्ठल आरुडे, संतोष जाधव, अजय नवले, हैदर पटेल, नाथा शिंगाडे, सतीश संचेती, सतीश कांबळे यांच्यासह वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रत्येक न्यायालयात जाऊन वकिलांच्या भेटी धंगेकर यांनी घेतल्या. त्यांचे आपुलकीने स्वागत करण्यात येत होते. जनसामान्यांतला नेता  आम्ही संसदेत पाठवणार आहोत. सामान्यांचे प्रश्न संसदेत मांडणारा लोकशाही जिवंत ठेवणारा पक्षाचा माणूस आम्ही देणार आहोत त्यामुळे आम्हाला आनंदच आहे, आशा भावना वकिलांनी व्यक्त केल्या. पुणे बार असोसिएशन, दि पूना वकिलांची ग्राहक सहकारी सोसायटी, दि पुणे लॉयर्स सोसायटी, जिल्हा महिला बार असोसिएशन, दिवाणी व फौजदारी न्यायालय, स्थानिक बार असोसिएशन, पूना बार क्लब, महिला वकील क्लबच्या वकील व सदस्यांशी धंगेकर यांनी संवाद साधला. लोकशाही वाचवणारा व आमचा चेहरा आम्हाला मिळाला आहे, विजय तुमचा निश्चित आहे, अशा भावना यावेळी वकिलांनी त्यांच्याशी बोलतांना व्यक केल्या. तसेच समाजामध्ये लोकोपयोगी खासदार धंगेकर यांच्या रुपात आम्ही पाहतो आहे, अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.

धंगेकर म्हणाले, लोकशाही वाचवण्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या वकिलांची ताकत मला मिळाली आहे. त्यामुळे मला हत्तीचे बळ आले आहे. हीच ताकद मी लोकशाही वाचवण्यासाठी वापरणार आहे. सध्या लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे सामान्य पेक्षा वकिलांना जास्त लढावे लागणार आहे. पुढील पिढीला वाचवण्यासाठी परिवर्तनाचा लढा आपल्याला द्यावा लागणार आहे. नागरिकांचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी मला तुमची साथ हवी आहे. मी जनसामान्यांतून पुढे आलो आहे मी आलो त्यामुळे त्यांचे प्रश्न मला माहित आहे, ते सोडवण्यासाठी मी 24 तास आपल्याला उपलब्ध आहे. निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील म्हणाले, सर्व वकील वर्गांनी लोकशाही वाचवण्यासाठी धंगेकर यांना पाठींबा दिला आहे. 

शिवाजी नगर न्यायालयातील सर्व संघटना, असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले व धंगेकर यांना पाठिंबा जाहीर केला.  अभय छाजेड (सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) ९८२२०२३४२९

Post a Comment

Previous Post Next Post