प्रबोधन वाचनालयात जागतिक ग्रंथ दिन साजरा




प्रेस मीडिया लाईव्ह:

इचलकरंजी :  ग्रंथ हे चिरकाळ टिकणारे साहित्य आहे. मानवी जीवनाच्या उत्क्रांतीमध्ये ग्रंथांचे स्थान महत्त्वाचे आहे.आपले व्यक्तिमत्त्व परिपूर्ण, संपन्न करायचे असेल तर ग्रंथवाचनाशिवाय तरणोपाय नाही. पुस्तक वाचन चळवळ विकसित होण्यासाठी समाजातील प्रत्येक कुटुंबाने सार्वजनिक वाचनालयाचे सभासद झाले पाहिजे, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे (पुणे )विभागीय संमेलन निमंत्रक आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (मुंबई) चे नियमक मंडळ सदस्य राजन मुठाणे यांनी व्यक्त केले.ते समाजवादी प्रबोधनीच्या प्रबोधन वाचनालयाच्या वतीने आयोजित केलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करताना बोलत होते.

 जागतिक कीर्तीचे महान साहित्यिक विल्यम शेक्सपिअर यांचा स्मृतिदिन अर्थात ' जागतिक पुस्तक दिन ' आणि ' महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा १५१ वा जन्मदिन 'याचे औचित्य साधून हे ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनात शेक्सपियर ,महर्षी शिंदे यांच्या  पुस्तकांसह इतर  विविध प्रकारची पुस्तके मांडण्यात आली होती.

यावेळी बोलताना प्रसाद कुलकर्णी म्हणाले,माणसाला जे स हीत नेते ते साहित्य असते.साहित्य जगण्याला भान,बळ आणि अर्थ देत असते. लेखन, वाचन आणि श्रवण या तीन कलांनी मानवी जीवन समृद्ध झालेले आहे. ही समृद्ध संस्कृती अधिक विकसित करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. समाज माध्यमांवरील वाचन हे साखोल व समृद्ध वाचन नसते. यावेळी प्रा.डॉ.एफ. एम.पटेल, सुनिल बारवाडे, नंदकिशोर जोशी,पांडुरंग पिसे ,रमेश लोहार, धोंडीराम शिंगारे, सौदामिनी कुलकर्णी, नंदा हालभावी,अश्विनी कोळी, विजय जाधव, ओंकार पाटील आदींसह अनेक जणांची उपस्थिती होती. या ग्रंथप्रदर्शननव्या लाभ साहित्य रसिकांनी घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post