केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या कामकाजात इचलकरंजी महानगरपालिकेची आघाडी




प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : गतिशक्ती व अन्य केंद्र शासनाच्या योजनांचा महानगरपालिका प्रशासनात जास्तीत जास्त उपयोग करुन नागरी सेवांचा दर्जा वाढवणे बाबतचा आढावा घेणे साठी आज दि.२३ एप्रिल  रोजी आयुक्त तथा संचालक नगरपरिषद संचालनालय मा.मनोज रानडे आयएएस यांनी महानगरपालिका आयुक्त यांच्या समवेत बैठकीचे आयोजन केले होते.
            
सदर बैठकीत श्री. मनोज रानडे सर, आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासनालय मुंबई यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन या कामकाजा बाबत उपस्थित सर्वांना आवश्यक ते मार्गदर्शन केले.  
     
यावेळी पी.एम. गतिशक्ती योजना राबविण्यासाठी पूर्वतयारी करण्यात इचलकरंजी महानगर पालिका राज्यात अग्रेसर असल्याबद्दल आयुक्त तथा संचालक मा.मनोज रानडे यांनी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांचे अभिनंदन करुन अन्य महानगरपालिकांना याबाबत मार्गदर्शन करण्याचे निर्देश दिले.

यावेळी मा. समीर उन्हाळेसर  सहआयुक्त न. पा. संचालनालय , 
मा. अजीज शेखसर आयुक्त उल्हासनगर मनपा, मा. दगडे मॅडम,आयुक्त धुळे महानगर पालिका, शहर अभियंता श्री क्षीरसागर, आदि मान्यवर उपस्थित होते.

  

Post a Comment

Previous Post Next Post