रंकाळा येथे झालेल्या खून प्रकरणातील आरोपीच्या कडुन मोटारीसह 3 दुचाकी ,रक्ताच्या डागाच्या कपडे आणि वापरलेली हत्यारे जप्त.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- रंकाळा येथे गुरुवारी (ता.04) रोजी अजय दगडू शिंदे याचा  झालेल्या खून प्रकरणातील   आरोपींच्या कडून जुना राजवाडा पोलिसांनी खून करताना वापरलेली हत्यारे ,कारसह मोटारसायकल आणि रक्ताच्या डागाची कपडे जप्त केली आहे. अजय याच्या खूनात आणि कोणाचा सहभाग आहे का याचा ही पोलिस शोध घेत आहेत.

4 तारखेला यादवनगरातील डवरी वसाहतीत वर्चस्व वादातुन अजय शिंदेचा खून केल्या प्रकरणातील मुख्य आरोपी रोहित अर्जुन शिंदे यांच्यासह त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक करून त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.यांच्याकडे अधिक चौकशीत अजय शिंदे वरचेवर खुन्नस नजरेने पाहत असल्याने तो आमचा गेम कधीही करेल याची भिती त्याना वाटत होती.म्हणून अजय शिंदेला ठार मारल्या शिवाय त्यांच्याकडे पर्याय नसल्याने या सर्वानी गेम करण्याचे ठरवून सर्वानी एकत्रितपणे हल्ला करायचा असे ठरले आणि मग यातील सर्वानी शर्स्त्रे खरेदी केल्याचे आरोपींनी पोलिसांना माहिती दिली.अजय शिंदे याचा खून करण्यासाठी यांना कोणी प्रोत्साहन दिलं का  किंवा सुपारी दिली का  त्या दृष्टिनेही पोलिस तपास करीत आहेत.असे सांगितले.

कोल्हापूर- रंकाळा येथे गुरुवारी (ता. 04) रोजी अजय दगडू शिंदे याचा  झालेल्या खून प्रकरणातील   आरोपींच्या कडून जुना राजवाडा पोलिसांनी खून करताना वापरलेली हत्यारे ,कारसह मोटारसायकल आणि रक्ताच्या डागाची कपडे जप्त केली आहे. अजय याच्या खूनात आणि कोणाचा सहभाग आहे का याचा ही पोलिस शोध घेत आहेत.4 तारखेला यादवनगरातील डवरी वसाहतीत वर्चस्व वादातुन अजय शिंदेचा खून केल्या प्रकरणातील मुख्य आरोपी रोहित अर्जुन शिंदे यांच्यासह त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक करून त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.यांच्याकडे अधिक चौकशीत अजय शिंदे वरचेवर खुन्नस नजरेने पाहत असल्याने तो आमचा गेम कधीही करेल याची भिती त्याना वाटत होती.म्हणून अजय शिंदेला ठार मारल्या शिवाय त्यांच्याकडे पर्याय नसल्याने या सर्वानी गेम करण्याचे ठरवून सर्वानी एकत्रितपणे हल्ला करायचा असे ठरले आणि मग यातील सर्वानी शर्स्त्रे खरेदी केल्याचे आरोपींनी पोलिसांना माहिती दिली.अजय शिंदे याचा खून करण्यासाठी यांना कोणी प्रोत्साहन दिलं का  किंवा सुपारी दिली का  त्या दृष्टिनेही पोलिस तपास करीत आहेत.असे सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post