डॉ. तुषार निकाळजे यांची महात्मा गांधी पुरस्कार २०२४ साठी निवड....

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे:- पुण्याचे संशोधक व लेखक डॉ. तुषार निकाळजे यांची तामिळनाडू येथील ईएसएन पब्लिकेशन यांनी  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ "महात्मा गांधी पुरस्कार २०२४" साठी निवड केली आहे. डॉ. निकाळजे यांनी आजपर्यंत १२ पुस्तके लिहिली व प्रकाशित केली आहेत. यामधील निवडणूक  विषयातील दोन  पुस्तके महाराष्ट्राच्या सात विद्यापीठे व तीन स्वायत्त महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमांना संदर्भ पुस्तक म्हणून मान्यता प्राप्त  आहेत.

 डॉ. निकाळजे यांनी दृष्टीहीन व्यक्तींसाठी  "अंडरस्टँडिंग द युनिव्हर्सिटी" हे ब्रेल- इंग्रजी पुस्तक लिहून प्रकाशित केले आहे.  या पुस्तकाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. डॉ. निकाळजे यांनी लेखन व निर्मिती केलेल्या "क्लर्क टू वर्ल्ड रेकॉर्ड"  या  डॉक्युमेंटरीची नोंद ब्रावो इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस, शारजा मध्ये झाली आहे .  वेगवेगळ्या वर्तमानपत्रात, नियतकालिकांमध्ये, तसेच विद्यापीठ अनुदान आयोग मान्यता प्राप्त रिसर्च जरनल मध्ये  एकूण ७८  लेख प्रकाशित केले आहेत. दोन आंतरराष्ट्रीय, दोन राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये चार शोधनिबंध लिहून सादर केले आहेत. डॉ. निकाळजे यांना आजपर्यंत पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, दिल्ली, लंडन, अमेरिका, शारजा येथील १४  शैक्षणिक व संशोधनात्मक पुरस्कार मिळाले आहेत. वर्ष २०२३  मध्ये गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन यांनी आयोजित केलेल्या "थिकेस्ट  बुक ऑफ द वर्ल्ड २०२३" यामध्ये डॉ. निकाळजे यांचा संपादक व लेखक सहभाग आहे. सेवानिवृत्तीनंतरही लेख, लिखाण, शोधनिबंध , पुस्तके लिहिणे हे काम अखंडपणे चालू आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगास प्रशासकीय सुधारणा देखील सुचविलेल्या आहेत. त्यातील काही सूचना समिती पुढे ठेवण्यात आल्या  आहेत, तर काही सूचनांची अंमलबजावणी करण्यात आली  आहे. वर्ष २०१९ मध्ये  महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने  निवडणूक निष्णात व्यक्ती म्हणून डॉ.निकाळजे यांची निवड केली होती. याचबरोबर विद्यापीठ शिक्षण, कायदे, संशोधन याबद्दल शासनास पत्र व्यवहार देखील चालू आहेत. ही सर्व कामे डॉ. निकाळजे यांनी स्वखर्चाने केली  आहेत. या सर्व शैक्षणिक व संशोधनात्मक कार्याची  दखल ईएसएन पब्लिकेशन यांनी घेऊन डॉ. निकाळजे यांना राष्ट्रपिता  महात्मा गांधी पुरस्कार  २०२४  साठी निवड केली आहे. दि.  २८  एप्रिल २०२४ रोजी तामिळनाडू येथे संपन्न होत असलेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात डॉ. निकाळजे यांना उपस्थित राहण्याची विनंती केली आहे. डॉ. तुषार निकाळजे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथून  मार्च- २०२२  मध्ये सहाय्यक कक्षअधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post