कोल्हापूर जिल्ह्यातील 19 हजार 140 मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणास सुरूवात

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर  : लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे वर्ग प्रशिक्षण व विशेष हाताळणी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

 या प्रशिक्षणासाठी एकूण 19 हजार 140 मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकारी व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम यंत्र हाताळणे, ईव्हीएमची वाहतूक, मतदान केंद्रांची रचना, केंद्रावरील सुरक्षाव्यवस्था, निवडणुकीच्या दिवशी मतदान सुरू होण्यापूर्वी करण्यात येणारे अभिरूप मतदान, मतदानावेळी तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास करावयाच्या उपाययोजनांबाबत प्रशिक्षण देण्यात आले. तसेच, मतदानावेळी निवडणूक आयोगांच्या सूचनांबाबतही यावेळी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. शुक्रवार दि.5 एप्रिल रोजी चंदगड, कागल, कोल्हापूर उत्तर यांचे प्रशिक्षण सुरू झाले. तर शनिवारी राधानगरी, कोल्हापूर दक्षिण, शाहूवाडी, हातकणंगले, इचलकरंजी येथील प्रशिक्षण सुरू झाले. या प्रशिक्षणास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी भेट देवून मार्गदर्शन केले. दि.7 एप्रिल पासून दोन दिवसीय प्रशिक्षणास शिरोळ येथे सुरूवात होणार आहे.

  विधानसभा निहाय अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या पुढिलप्रमाणे 271 चंदगड विधानसभा मतदार संघासाठी 1673, 272 राधानगरी विधानसभा मतदार संघासाठी 2209, 273 कागल विधानसभा मतदान संघासाठी  2270,  274 कोल्हापूर दक्षिण  विधानसभा मतदान संघासाठी  2004, 275 करवीर विधानसभा मतदान संघासाठी  1570, 276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदान संघासाठी  2927,  277 शाहूवाडी विधानसभा मतदान संघासाठी  2000, 278 हातकणंगले विधानसभा मतदान संघासाठी  1474, 279 इचलकरंजी विधानसभा मतदान संघासाठी  1123 तर 280 शिरोळ विधानसभा मतदान संघासाठी  1890 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे एकूण 19 हजार 140 मतदान केद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post