सोमवती अमावस्येला यंदाचे पहिले सूर्यग्रहण, घडू शकता या सहा विचित्र घटना

 

प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी  : सुनील पाटील

 खगोलशास्त्रात ग्रहणाला विशेष महत्त्व आहे. त्यानुसार, या वर्षातील पहिले सूर्य ग्रहण 8 एप्रिल रोजी होत आहे. पंचांगानुसार, या दिवशी सोमवती अमावस्या देखील आहे.

 या ग्रहणादरम्यान, अमेरिका, उत्तर मेक्सिको आणि कॅनडाच्या अनेक भागात काही मिनिटे अंधार असेल. ही अनोखी खगोलीय घटना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक अमेरिकेला जात आहेत. अमेरिकेतही सूर्यग्रहण पाहण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सूर्यग्रहण पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी नायग्रा फॉल प्रशासनाने आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे. अशा परिस्थितीत जाणून घ्या या खग्रास सूर्यग्रहणादरम्यान कोणत्या सहा विचित्र घटना घडू शकतात, ज्यावर सर्वांचे लक्ष असेल.

अचानक वारा-वादळ

संपूर्ण सूर्यग्रहण दरम्यान, अचानक वारा-वादळ सुरु होऊ शकतो. यासह जमीन वेगाने थंड झाल्यामुळे वाऱ्याचा वेग आणि दिशा बदलू शकते. या बदलाचा शोध 2016 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंगच्या संशोधन पथकाने लावला होता. 

असामान्य सावली

खग्रास सूर्यग्रहण दरम्यान, पृथ्वीवर विचित्र सावल्या तयार होतात, जसे की, झाडाखीली चंद्रकोर सावल्या. या ग्रहण-प्रेरित सावली पाहण्यासाठी पिनहोल प्रोजेक्टर वापरण्याची सूचना NASA तर्फे देण्यात येते. 

तापमानात घट

सूर्यप्रकाश रोखल्या गेल्याने तापमानात झपाट्याने घट होते. अशा परिस्थितीत, काही ठिकाणी तापमानात 20 अंशांपेक्षा जास्त घसरण होऊ शकते, ज्यामुळे वातावरण अचानक थंड होऊ शकते.

बेलीज बीड्स

याला डायमंड रिंग इफेक्ट असेही म्हणतात. जेव्हा सूर्यप्रकाश संद्रमाच्या काठावर हिऱ्याच्या अंगठीसारखा दिसतो तेव्हा बेलीज बीड्स तयार होते. योग्य उपकरणांसह पाहिल्यास हे दृश्य आश्चर्यकारक ठरते. यावेळी, सूर्याची फक्त बाह्य किनार गोल रिंगच्या आकारात दिसते.

प्राण्यांचे वर्तन बदलते

संपूर्ण सूर्यग्रहणाच्या वेळी अचानक अंधार पडल्यामुळे घुबडांपासून ते अनेक प्राणी-पक्षी किंचाळू लागतात. दिवसाचा प्रकाश कमी झाल्यामुळे हे प्राणी अचानक असामान्य वागू लागतात. अचानक रात्र झाल्यासारखी त्यांची प्रतिक्रिया असते. NASA Eclipse Soundscapes प्रकल्प या सर्व प्रकाराचे अध्ययन करते

दिवसा ते रात्री आणि दिवसा अचानक होणारे बदल प्राणी आणि वनस्पती या दोन्हींवर परिणाम करतात. यामुळे प्राणी आणि वनस्पतीच्या Circadian Rhythm मध्ये बदल होतात. हे बदल तात्पुरते असतात. ग्रहणानंतर बहुतेक जीव त्वरीत त्यांच्या सामान्य चक्रात परत येतात.

Post a Comment

Previous Post Next Post