स्थानिक नागरिकांचा " अपना वतन " संघटनेच्या समर्थनार्थ " स्वाभिमान आंदोलन "

काळाखडकच्या नागरिकांकडून सिद्दीकभाई शेख यांच्या प्रतिमेस " दुग्धाभिषेक "

प्रेस मीडिया लाईव्ह :

काळाखडक येथे विकसकाने काही स्थानिक कार्यकर्त्यांना व गुंडाना हाताशी धरून " अपना वतन " संघटनेची बदनामी करण्याच्या उद्देशाने " जोडे मारो " आंदोलन घडवून आणले . त्यामुळे आम्ही काळाखडक मधील सर्व नागरिक " अपना वतन " संघटनेच्या सोबत आहोत हे सांगण्यासाठी व तथ्यहीन आरोप करून " अपना वतन " संघटनेला बदनाम करणाऱ्या विकसक व विरोधक यांचेवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज रविवार दिनांक ७/०४/२०२४ सकाळी ११ वाजता अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांच्या समर्थनार्थ काळाखडक येथील शेकडो नागरिकांनी एकत्र येत " स्वाभिमान " आंदोलन केले . यावेळी सिद्दिकभाई शेख यांच्या प्रतिमेला दूध अर्पण करून , दुग्धाभिषेक करण्यात आला . यावेळी अनेक महिला व नागरिक उपस्थित होते . यावेळी नागरिकांनी सिद्दीकभाई आगे बढो , हम तुम्हारे साथ है , हमारा नेता कैसा हो , सिद्दीकभाई जैसा हो , आम्ही सिद्दीकभाई सोबत ,आम्ही सच्चाई सोबत , अशा घोषणा देऊन नागरिकांनी परिसर दणाणून सोडला . 


  यावेळी नागरिकांनी " अपना वतन " संघटनेला बदनाम करणाऱ्या विकसक व विरोधक यांचेवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन पोलीस आयुक्त पिंपरी चिचंवड  , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , वाकड पोलीस स्टेशन यांना दिलेले आहे .आंदोलनावेळी नागरिकांनी सांगितले कि, विकसक आर्थिक आमिष देऊन काही स्थानिक कार्यकर्त्यांना व गुंडाना हाताशी धरून नागरिकांचा विरोध असताना जोर जबरदस्तीने प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न करीत आहे . तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून झोपडपट्टी अधिनियम मधील तरतुदीनुसार अटी व शर्थीचे उल्लंघन करून , बेकायदेशीरपणे प्रकल्प राबवत असल्याने काळाखडक झोपडपट्टी धारकांचा एसआरए प्रकल्पाला तीव्र विरोध आहे. या बाबत नागरिकांनी स्थानिक कार्यकर्ते व  नेते यांच्याकडे मदतीसाठी हात पसरले परंतु सगळ्यांनी हात वर केले . एसआरए चे मुख्य अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे सण २०१२ च्या प्रस्तावाच्या आधारे प्रकल्प राबविल्यास  काळाखडक पुनर्वसन प्रकल्पात बोगस व बनावट कारभारामुळे शेकडो नागरिक बेघर होण्याची भीती निर्माण झालेली आहे. त्यामुळे आम्हाला कोणी वाली राहिलेला नसल्याने , गोरगरिबांच्या समस्यांची जाण असणारे , प्रामाणिक नेतृत्व , अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांचेकडे काळाखडक येथील स्थानिक नागरिकांनी दिनांक १४ मार्च २०२४ रोजी ५०० स्वाक्षऱ्या असलेले निवेदन दिलेले आहे. त्यामध्ये आम्ही त्यांना काळाखडक येथील नागरिकांना बेघर होण्यापासून वाचविण्यासाठी आमच्यामार्फत प्रशासकीय स्तरावर व न्यायालयीन स्तरावर लढाई लढण्याची विनंती केलेली आहे . त्यानुसारच अपना वतन संघटनेने काळा खडक येथील नागरिकांसाठी कायदेशीर आंदोलन केलेले आहे . संघटनेने आमच्या मागण्या रीतसर पद्धतीने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांचेकडे निवेदनाद्वारे पोहचवलेल्या आहेत .परंतु विकसकाने काही जणांना समोर करून व्यक्तीक टीका करून बदनामीचा प्रयत्न केला आहे .  

                    दरम्यान विकसकाने काही स्थानिक कार्यकर्त्यांना हाताशी धरून " अपना वतन " संघटनेच्या कार्यकर्त्यांना बदनाम करण्यासाठी " जोडे मारो " आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या माध्यमातून बिनबुडाचे ,तथ्यहीन आरोप करून सिद्दीक शेख यांना बदनाम करण्याचा घाट विकसक व काही लाचार लोकांनी केलेला आहे . परंतु अपना वतन संघटनेच्या सामाजिक कार्याबद्दल व प्रामाणिकते बाबत संपूर्ण पिंपरी चिचंवड शहरातील जनतेला माहित आहे . त्यामुळे योद्धा जेंव्हा शरण येत नाही ,तेव्हा बदनाम केला जातो . त्यामुळे आम्ही काळाखडक मधील सर्व नागरिक अपना वतन संघटनेच्या सोबत आहोत. आमचा काळा खडक येथील बेकायदेशीर प्रकल्पाला विरोध असून आमचा लढा अधिक तीव्र करणार आहोत. यावेळी काळाखडक येथील विकास पंडागळे , प्रदीप जाधव , रवी दांडे , श्रीकांत विटकर , विजय जाधव ,नयूम पठाण , कयूम पठाण , किरण जाधव , निखिल चौगुले , सोमनाथ देवकर , विमल पवार , मीना मंजुळकर , संगीता काळे , बानू शेख यांसह नागरिक मोठ्या संख्ने उपस्थित होते. 

प्रतिक्रिया :-

स्थानिक नागरिक - विकास पंडागळे - ९५२७७५५२१०

अपना वतन हि कायदेशीर काम करणारी संघटना म्हणून संपूर्ण शहराला परिचित आहे . एस आर ए योजनेच्या नियमावली नुसार काळाखडक येथील शेकडो नागरिक अपात्र होणार आहेत . वर्षानुवर्षे राहणारे नागरिक बेघर होणार असल्याने स्थानिक नागरिकांनी संघटनेला लेखी पत्र दिल्यानुसार संघटनेने आमच्या मदतीसाठी आम्हाला प्रशासकीय व न्यायालयीन स्तरावर मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.त्यामुळे आम्ही स्थानिक अपना वतन संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत.  


अधिक माहितीसाठी :- 

सिद्दीकभाई शेख - अध्यक्ष  , अपना वतन संघटना 

मोबाईल - ९६६५४८४७८६

Post a Comment

Previous Post Next Post