पेणमध्ये चरस विक्रीसाठी आलेल्या दोघांना रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या

 

प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

पेणमध्ये चरस विक्रीसाठी आलेल्या दोघांना रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. त्यांच्याकडून १ किलो चरस जप्त करण्यात आले आहे.अटक केलेल्या दोघांनाही पेण न्यायालयाने २६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे चरस विकण्यासाठी काही इसम येणार असल्याची माहिती रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार सोमवारी, २२ एप्रिल रोजी पोलिसांनी पेण परिसरात सापळा रचला.

मोटारसायकलवरुन आलेल्या श्रवणकुमार कनकरत्नम (वय २७,रा.इंडीया बुल्स रेसिडेन्सी, पनवेल) व त्याच्यासोबत असलेली महिला खुशबू दिलिप शहा (वय ३०,रा.बदलापूर) यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ५ लाख २० हजार रुपये किंमतीचा एक किलो २० ग्रॅम किंमतीचे चरस सापडून आले. त्यांना अटक करत,पेण न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या चरसचे धागेदोरे दिल्लीपर्यंत असल्याचे समजते.याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील अधिक तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post