अंबप येथे झालेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यु.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर -हातकंणगले तालुक्यातील अंबप येथील अमीर करीम मुल्ला (वय 29) याला आंबेडकररोड परिसरात झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने नातेवाईकांनी उपचारा साठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झालाचे डॉक्टरांनी सांगितले.

या बाबतची फिर्याद त्याचे सासरे अल्लाउद्दीन बाळू सनदी यांनी सीपीआर पोलिस चौकीत दिली आहे.आमीर हा त्या परिसरात चिकन चा व्यवसाय करत असल्याचे समजले आणि ही मारहाण अनैतिक संबंधातुन झाल्याची सीपीआर आवारात दबक्या आवाजात चालू होती.

Post a Comment

Previous Post Next Post