इचलकरंजी महानगर पालिकेच्या वतीने लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचे अनुषंगाने मतदान जनजागृती साठी एन.सी.सी. विद्यार्थ्यांची रॅली मोठ्या उत्साहात संपन्न.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

 इचलकरंजी  : लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ ची अधिसुचना मा. भारत निवडणुक आयोगा कडून जारी करणेत आलेली असुन, या अंतर्गत ४८, हातकंगणले लोकसभा मतदार संघाचे मतदान मंगळवार दिनांक ०७ मे २०२४ रोजी होणार आहे.

            या मतदार प्रक्रियेत इचलकरंजी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून मतदानाचा पवित्र हक्क बजावावा यासाठी मतदार जनजागृती अभियानातंर्गत महानगरपालिकेचे वतीने आज शनिवार दि.२० एप्रिल रोजी आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे तसेच उपायुक्त प्रसाद काटकर आणि सोमनाथ आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदान जनजागृतीसाठी शहरातील शाळा महाविद्यालतील एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांच्या रॅलीचे आयोजन करणेत आलेले होते.

     या मतदान जनजागृती  रॅली मध्ये डि. के. ए. एस. सी. महाविद्यालय, गोविंदराव हायस्कूल ॲड ज्युनिअर कॉलेज, आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, बापुजी साळुंखे हायस्कूल ॲंड ज्युनिअर कॉलेज एन.सी.सी.चे विद्यार्थी सहभागी झाले होते.

 तसेच यावेळी सहा. आयुक्त विजय राजापुरे, मुख्याध्यापक शंकर पोवार, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, रेकॉर्ड किपर संजय सुभेदार, सहा.क्रीडा अधिकारी संजय कांबळे, प्रदीप झमरी, विजय पाटील, करण लाखे, तानाजी कांबळे यांचेसह एन.सी.सी. च्या प्रा.संतोषी जावीर, प्रा. चंद्रकांत कोरे, प्रा.विनायक भोई,  प्रा.रोहित शिंगे यांचेसह महानगरपालिकेचे  विभाग प्रमुख, अधिकारी कर्मचारी, सफाई कर्मचारी  मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

       सदर रॅली श्री  शिवतीर्थ ते के.एल.मलाबादे चौक मार्गाने संपन्न झाली. या ठिकाणी उपस्थित सर्व विद्यार्थी अधिकारी कर्मचारी आणि नागरिक यांनी मतदान प्रतिज्ञा ग्रहण केली.


       

Post a Comment

Previous Post Next Post