कायदेशीर परवानगी न घेता मेळावा घेतल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांच्यासह 40 जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांना पाठिंबा देण्यासाठी आचारसंहितेचे उंल्लघंन करून कायदेशीर परवानगी न घेता मेळावा घेतल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांच्यासह 40 जणांच्यावर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पुईखडी येथे असलेल्या मंगल कार्यालयात रविवारी (ता.14) दुपारी आयोजित केला होता.याची फिर्याद पोलिस हवालदार अविनाश भिकाजी पोवार यांनी करवीर पोलिस ठाण्यात दिली.सध्या आचारसंहिता सुरु असून या दुर्लक्ष करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ए.वाय .पाटील यांनी कार्यकर्त्यासह वाहनांची  रॅली काढ़त न्युपॅलेस येथे जाऊन पुई खडी येथे असलेल्या मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांचा मेळावा  घेतला.

याची पोलिस प्रशासन किंवा निवडणुक निर्णय अधिकारी यांची कोणतीही परवानगी न घेता जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी ए.वाय .पाटील यांच्यासह अविनाश आनंदराव पाटील,राजाराम यंशवंत पाटील,शिवानंद महाजन (सर्व रा.सोळांकूर ता.राधानगर ) दिनकर बाळा पाटील (रा.आणाजे) राजाराम काकडे (रा.आवळी) नेताजी पाटील (मांगोली,) शिवाजी पाटील (आरळे) आणि दिपक पाटील (रा.कांबळवाडी) यांच्यासह 30 ते 40 जणांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील आचार संहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणी पहिलाच गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post