तारदाळ व खोतवाडी गावांचा ट्रान्सफॉर्मर बिघाडामुळे पाणी पुरवठा खंडीत


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी :  श्रीकांत कांबळे 

तारदाळ, खोतवाडी ता. हातकणंगले येथे भारत निर्माण नळपाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो.परंतू दानोळी येथील जॅकवेल वरील ट्रॉन्स्फॉर्मर जळाल्याने गेली  पाच ते सहा  दिवस पाणी पुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे दोन्ही गावांना पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. तर पाणी पुरवठा चालु होणेस आणखी काही दिवस लागणार असल्याने महिला व नागरीक हैराण झाले आहेत.तारदाळ, खोतवाडी या दोन्ही गावांना आठ ते दहा दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत असून 

काही तांत्रिक कारणाने पाणी पुरवठा बंद झाल्यास बारा ते पंधरा दिवसांनी पाण्याची वाट पहावी लागत आहे. तसेच  तारदाळ परिसरातील कुपनलीकाची पाण्याची पातळी पूर्णतः खालावल्याने अनेक कुपनलीका बंद अवस्थेत आहेत. तर पाणी असणाऱ्या कुपनलीका अनेक तांत्रिक कारणाने बंदआहेत.

या गंभीर बाबीकडे मात्र ग्रामपंचायतींने दुर्लक्ष केले आहे. तसेच तारदाळ या गावासाठी इतर कुठलेही दुसरे पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नसल्याने दोन्ही गावांना भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेवर अवलूबन रहावे लागत आहे. तसेच भारत निर्माण योजना ही कालबाह्य होत चालली असून  तारदाळ व खोतवाडी गावांसाठी साधारणता 52 कोटी रुपयाची नवीन जलजीवन योजना मंजूर असून त्याचे काम संथ गतीने चालू आहे. त्यामुळे ही योजना कधी चालू होईल याचीही स्पष्टता दिसून येत नाही. तसेच सततची जलवाहिनी गळती, विद्युत पुरवठा खंडीत तर अनेक तांत्रिक कारणाने या योजनेचे सातत्य दिसून येत नाही. त्यामुळे पाण्याची समस्या ऐन उन्हाळ्यात गंभीर होवू लागली आहे. अनेक ठिकाणी कुपनलिकेला पाणी असूनही ग्रामपंचायत याबाबत ठोस पाऊले उचलत नसल्याने महिला व नागरिकांन नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

      नागरिकांना स्वच्छ व मुबलक पिण्याचे पाणी मिळावे यासाठी  नियोजन समितीच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून संयंत्र उपलब्ध करून दिले असून देखभाल,दुरुस्ती अभावी बंद अवस्थेत असुन त्यामुळे नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.तेव्हा शासनाने लक्ष देऊन संयंत्र पुर्वत करावे*

       त्याचबरोबर अजुनही तीन ते चार  महिने तारदाळ व खोतवाडी या दोन्ही गावांना पाणीटंचाई  राहणार असल्याने तारदाळ, खोतवाडी ग्रामपंचायतीने पर्यायी पाण्याचे नियोजन लावणे गरजेचे  आहे. तर  रखडलेले जलजीवन योजनेचे काम लवकर पूर्ण करावे व पाण्याची समस्या दुर करावी अशी मागणी महिला नागरीकातून होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post