डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार - 2024 च्या उत्कृष्ठ निवेदिका ( BEST ANCHOR ) पुरस्कारासाठी सौ. शबाना राजेखान पटेल यांची निवड .


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे  : डॉ.मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार - 2024 साठी उत्कृष्ठ निवेदिका ( BEST ANCHOR ) पुरस्कारासाठी  पुण्यातील सौ. शबाना राजेखान पटेल यांची निवड करण्यात आल्याची घोषणा आज थोर समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांनी केली . सौ. शबाना पटेल यांचे सामाजिक कार्य व अल्फाज टीव्ही - मराठी साठी करत असलेल्या उत्कृष्ठ निवेदनाने समाजाचे प्रबोधन होत असल्याने त्यांची निवड करण्यात आल्याचे यावेळी डॉ.भोळे यांनी स्पष्ट केले . 

27 एप्रिल 2024 रोजी डॉक्टर मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार समारंभ होणार असून हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन , माल धक्का चौक , मंगळवार पेठ ,  पुणे स्टेशन जवळ आयोजित करण्यात आला आहे .  कार्यक्रमाची वेळ सायंकाळी 5 ते 8 राहणार आहे. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रवींद्र भोळे राज्यभरातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

मॅक्सेस अवॉर्ड विनर, गुजराथ रत्न,पद्मश्री डॉक्टर मनीभाई देसाई यांनी कृषी, गोपैदास , पर्यावरन, निसर्गोपचार, इत्यादी क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी केली. डॉक्टर मनीभाई देसाई श्वेतक्रांतीचे जनक व दुग्ध गंगेचे भागीरथी ते महान राष्ट्रभक्त त्याचप्रमाणे जहाल मतवादी राहून त्यांनी स्वातंत्र्यसंग्रमामध्येही भाग घेतलेला ते महान स्वातंत्र्य सेनानी क्रांतिवीर होतें. मात्र महात्मा गांधीजींच्या सानिध्यात राहून त्यानी गांधीवादाचा स्वीकार केला. 

उरुळी कांचन येथील ज्येष्ठ समाजसेवक प्रवचन कार ,अपंग सेवक ,शांती सेनेचे पुरस्कर्ते व सामाजिक न्यायाचे ऊर्जा स्तोत्र डॉ रविंद्र भोळे यांनी पद्मश्री मनीभाई देसाई यांचे बरोबर कार्य केलेले आहे. मराठवाडा भूकंपामधे त्याचप्रमाणे उरुळी कांचनच्या गॅस्ट्रो साठी मध्ये कार्य केलेले आहे. पद्मश्री डॉक्टर मणिभाईजी बरोबर अनेक उपक्रमांमध्ये सहभाग घेतलेला आहे. 14 नोव्हेंबर 1993 रोजी पद्मश्री डॉक्टर मणिभाई देसाई यांचा स्वर्गवास झाला. त्यामुळे डॉक्टर रवींद्र भोळे यांनी पद्मश्री डॉक्टर मणिभाई देसाई प्रतिष्ठान , डॉक्टर मणिभाई देसाई मानव ट्रस्ट या संस्थांची स्थापना केली. व पर्यावरण ,आरोग्य ,सामाजिक धार्मिक, वैद्यकीय ,विविध आरोग्य विषयी उपक्रम ,वोकेशनल ट्रेनिंग कोर्सेस ,निसर्गोपचार कोर्सेस व अत्यल्प दरात वैद्यकीय सेवा इत्यादी उपक्रम राबवले. 

गेली तीस वर्षापासून डॉक्टर रवींद्र भोळे पद्मश्री डॉक्टर मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार , सरदार वल्लभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार ,  एपीजे अब्दुल कलाम राष्ट्ररत्न पुरस्कार इत्यादी पुरस्कार कार्यकर्त्यांना देऊन स्फूर्ती देण्याचे कार्य करीत आहेत. आतापर्यंत डॉक्टर रवींद्र भोळे यांनी संस्थेच्या माध्यमातून 25000 कार्यकर्त्यांना राज्यभर व राष्ट्रीय पातळीवर पद्मश्री डॉक्टर मनीभाई देसाई राष्ट्र पुरस्कार देऊन राष्ट्र सेवेसाठी स्फूर्ती देण्याचे कार्य केलेले आहे. राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी व जातिवंत समर्पित भावनेने राष्ट्रासाठी कार्य करणारे कार्यकर्ते निर्माण होण्यासाठी उपक्रम आहे.

Post a Comment

Previous Post Next Post