इचलकरंजी महानगरपालिकेकडून ए.एस.सी. महाविद्यालय परिसरातील अतिक्रमण हटविले.

 


  


प्रेस मीडिया लाईव्ह  : 

 इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी   शहरातील सर्व ठिकाणचे अतिक्रमण तातडीने हटविणेचे आदेश अतिक्रमण निर्मूलन विभागास दिले होते. या आदेशानुसार  सोमवार दि.२२ एप्रिल रोजी महानगर पालिका अतिक्रमण निर्मूलन  विभाग प्रमुख सुभाष आवळे यांनी इचलकरंजी - कोल्हापूर रोडवरील ए.एस.सी. महाविद्यालय परिसरातील सर्व अतिक्रमण हटविले.


  आजच्या मोहिमेत जवळपास ११ हातगाडे तसेच छत्रपती शाहू महाराज पुतळ्या नजीकचे कलिंगड स्टॉल हटविण्यात आले.आजच्या मोहिमेत गणेश पुजारी, मारुती जावळे, धोंडीराम कांबळे, प्रकाश हेगडे, पिंटु कांबळे, कुदरत गोलंदाज ,विकास लाखे आदी सहभागी झाले होते.

    महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अतिक्रमण निर्मूलन मोहीम यापुढे सुद्धा सुरू राहणार आहे. 


       

Post a Comment

Previous Post Next Post