इचलकरंजी महानगर पालिकेच्या वतीने लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचे अनुषंगाने मतदान जनजागृती मोटरसायकल रॅली मोठ्या उत्साहात संपन्न.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

  इचलकरंजीो  : कसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ ची अधिसुचना मा. भारत निवडणुक आयोगा कडून जारी करणेत आलेली असुन, या अंतर्गत ४८, हातकंगणले लोकसभा मतदार संघाचे मतदान मंगळवार दिनांक ०७ मे २०२४ रोजी होणार आहे.

            या मतदार प्रक्रियेत इचलकरंजी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून मतदानाचा पवित्र हक्क बजावावा यासाठी मतदार जनजागृती अभियानातंर्गत महानगरपालिकेचे वतीने आज शुक्रवार दिनांक १९ मे रोजी आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे तसेच उपायुक्त प्रसाद काटकर, स्मृती पाटील आणि सोमनाथ आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदान जनजागृती मोटर सायकल रॅलीचे आयोजन करणेत आलेले होते.

     या मतदान जनजागृती मोटरसायकल  रॅली मध्ये सहा.आयुक्त केतन गुजर, विजय राजापुरे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, आरोग्य अधिकारी डॉ सुनीलदत्त संगेवार, कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे यांचेसह महानगरपालिकेचे  सर्व  विभाग प्रमुख, अधिकारी कर्मचारी, महिला कर्मचारी, प्राथमिक माध्यमिक शाळेचे शिक्षक- शिक्षिका आदीं मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

       सदर रॅली  छत्रपती शाहू महाराज पुतळा - शिवतीर्थ - महात्मा गांधी पुतळा - लोकमान्य टिळक पुतळा - रसना कॉर्नर - श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह - चांदणी चौक - छत्रपती संभाजी महाराज चौक - शिवतीर्थ  ते महानगरपालिका मुख्य कार्यालय या  मार्गाने संपन्न होवुन महानगरपालिका मुख्य कार्यालय  येथे रॅलीची सांगता झाली. या ठिकाणी उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी यांनी मतदान प्रतिज्ञा ग्रहण केली.


       

Post a Comment

Previous Post Next Post