प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : हातकंणगले- येथील प्रेस फोटो ग्राफर जगन जामदार यांचा शनिवारी अपघात झाला होता.आज त्यांचा खाजगी रुग्णालयात उपचार चालू असताना मृत्यु झाला.
अधिक माहिती अशी हातकंणगले येथील प्रेस फोटो ग्राफर जगन जामदार शनिवारी आपल्या दुचाकी वरुन जात असताना अचानक चक्कर आल्याने डोक्यावर पडुन गंभीर जखमी झाले होते.त्यांना प्रथम आयजीएम रुग्णालयात दाखल केले होते.नंतर त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.उपचार चालू असताना त्यांचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.या अपघाताची नोंद तेथील पोलिस ठाण्यात झाली आहे.
Tags
कोल्हापूर