लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करून ब्लॅकमेल करणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- लग्नाचे आमिष दाखवून पीडीत तरुणीवर लैगिक अत्याचार करून तिला ब्लँकमेल करणारा अमोल विनायक कांबळे (रा.कंळबा परिसर ,ता.करवीर ) याच्या विरोधात पीडीत तरुणीने करवीर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने करवीर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  अधिक माहिती अशी ,अमोल कांबळे आणि पीडीत तरुणीची वधू -वर सुचक कार्यालयात ओळख झाली होती.सदर पीडीत तरुणीस लग्णाचे आमिष दाखवून   तिच्या लैगिक अत्याचार करून त्याचा व्हिडीओ तयार करून तो तुझ्या घरच्यांना आणि पै पाहुण्यांना दाखविण्याची भिती दाखवून वारंवार पैशाची मागणी करुन पैसे उकळू लागला .या भितीने पहिल्यांदा 80 हजार रुपये दिले असता त्याने या संधीचा फायदा घेत आणखी मोठ्या रक्कमेची मागणी केली असता परत दोन लाख रुपये दिल्याने अमोलचे धाडस वाढ़ल्याने आणि मागणी करुन त्रास देऊ लागल्याने शेवटी या त्रासाला कंटाळून करवीर पोलिसांत जाऊन अमोल कांबळे विरोधात तक्रार दाखल केली.ही घटना सप्टें.23 ते फ़ेब्रु.24 या दरम्यान घडल्याची माहिती दिली.करवीर पोलिसांनी अमोल कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलिस त्याचा शोध घेत असल्याचे करवीर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी माहिती दिली.

Post a Comment

Previous Post Next Post