शहर वाहतूक शाखा,इंडस टॉवर लिमिटेड व वेदांत कमर्शियल सर्व्हिसेस तर्फे राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी:शहर वाहतूक नियंत्रण शाखा इचलकरंजी, इंडस टॉवर लिमिटेड व वेदांत कमर्शियल सर्व्हिसेस यांच्या सयूंक्त विद्यमाने आज इचकरंजी शहरा मध्ये राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह साजरा करणेत आला.

         




  इचलकरंजी शहरांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या वाहनधारकांचे गुलाब पुष्प देऊन  स्वागत केले.यामध्ये प्रामुख्याने ज्या मोटारसायकल चालकांनी डोक्यावर हेल्मेट घातले आहे व ज्या चारचाकी वाहणातील ड्रायव्हरनी सीटबेल्ट घातले आहेत अशा 60 वाहन चालकांना गुलाब पुष्प देऊन सत्कार केला.तसेच काही वाहन चालकांनी हा नियम पाळला नाही म्हणून त्यांनाही रोड सेफ्टी नियमांचे पालन आपण किती काळजीपूर्वक केले पाहिजे आणि रस्त्यावरील अपघात कमी झाले पाहिजे याचे महत्व सांगून गुलाब पुष्प देऊन रोड सेफ्टी नियमाबद्दल व राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह संदर्भात जनजागृती केली.

            यावेळी शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राजीव पाटील साहेब,कंपनीचे इंजिनियर राजेश म्हात्रे,ऑपरेशन हेड शांता सर,ऑपरेशन मॅनेजर किरण पाटील,टीम मॅनेजर प्रदीप देसाई,सेफ्टी मॅनेजर धीरज पाटील,सेफ्टी आंबेसीटर ओंकार संकेश्वरी,वाहतूक शाखेचे सहायक फौजदार हिंदुराव चरापले,सुरेश कोरवी,एम वाय पाटील,सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगावे तसेच कंपनीचे इचलकरंजी शहरातील व ग्रामीण परिसरातील तंत्रज्ञ राहुल घाटगे,पवन माने,अमोल शहापुरे, प्रसाद मोहिते,धीरजकुमार नेजकर,दिलीप बाणदार  उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post