पाचपीर दर्ग्याच्या 444 वे उरुस शुक्रवार दि. 8 मार्च साजरा करण्यात येणार



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : पाचपीर दर्ग्याच्या 444 वे उरुस शुक्रवार दि. 8 मार्च साजरा करण्यात येणार  आहे .  या उरुसाच्या  निमित्ताने 8,9,10 मार्च या तिन्ही दिवसाच्या कार्यक्रमात सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. 

शुक्रवार दि. 8 मार्च रोजी सायं 7 वाजता संदल व रात्री 9 वाजता समाखानी होणार आहे.

शनिवार दि.9 मार्च रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 7 वा ,पर्यंत  . (  हर्ष फाऊंडेशनच्या वतीने ). भव्य रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य व नेत्र तपासणी करण्यात येणार आहे . तर संध्याकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत पुण्यातील सुप्रसिध्द कव्वाल हैदर नाझा, अमर पुणेकर, सायबा चिश्ती,अल्तमश चिश्ती, शिवानी नाझ, यांचा कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे. दिनांक 10 मार्च रोजी देखील सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिर मोफत आरोग्य शिबिर व नेत्र तपासणी होणार असून या वेळी सुप्रसिद्ध कव्वाल अजीम नाझा यांचा कव्वालीचा बहारदार कार्यक्रम होणार आहे व  नंतर आम लंगर ( महाप्रसाद ) ठेवण्यात आला आहे 





टीप - रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस प्रमाणपत्र देण्यात येईल. रक्तदान हेच श्रेष्ठ दान. 

स्थळ - पाचपीर दर्गाह, 1 पुणे - सोलापूर रोड,बंगला नंबर 1, पुलगेट पेट्रोल पंप समोर, पुणे

 आपला दर्गाह सेवक..जयकुमार एम.राघवाचारी..मो. नं.7387537709

____________________________

Post a Comment

Previous Post Next Post