ईव्हीएम मशीनवर बंदी घालावी मागणी करिता पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे मुंबई आझाद मैदानावर धरणे आंदोलन

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई : भारतीय लोकशाहीला समृद्ध करण्यासाठी देशातील सर्व निवडणुका EVM मशीन वर न घेता केवळ बॅलेट पेपर वर घ्यावी या प्रमुख मागणीसाठी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले यांच्या   नेतृत्वाखाली 1 मार्च 2024 रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर निदर्शने व धरणे आंदोलनास सुरवात करण्यात आले

आगामी सर्व निवडणुकीमध्ये EVM मशीन वर कायम स्वरूपी  बंदी घालुन बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी भारताचे राष्ट्रपती , केन्द्रीय निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्यपाल , व महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्या कडे निवेदना द्वारे केली  होती . त्यानुसार आज आझाद मैदान येथे  धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी ज्योती झरेकर प्रदेश संघटक ,  मिराताई वहर प्रदेश अध्यक्षा महिला आघाडी , प्रा . अरुण मेढे प्रदेश उपाध्यक्ष , जयसिंग कांबळे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य,  जोषना मंत्री पालघर जिल्हा अध्यक्षा, श्रीमती प्रेरणा दिपंकर कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्षा लक्ष्मीकांत कुंबळे , निखील झरेकर  आदी सहभागी झाले होते

Post a Comment

Previous Post Next Post