कोल्हापुर महानगरपालिकेत पर्मनंट पेक्षा ठोक मानधन काम करीत असलेल्यांचा मनमानी कारभार.

  मा.आयुक्तसो यांनी याकडे लक्ष घालण्याची मागणी.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- कोल्हापूर महानगरपालिकेत सध्या कुणाचा कुणाला ताळमेळ नाही.कोणी कधी ही येतो आणि कधीही जातो.या कडे वरिष्ठ अधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.गेल्या काही वर्षांपासून ठोक मानधन काही भागात आधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पण ही नियुक्तीला काही अटी आणि मर्यादा असताना सुध्दा काहीनी मनमानी कारभार चालू केला असल्याचे कामगार वर्गातुन बोलले जात आहे.यातील काही जण नियुक्ती झाल्या पासून आज अखेर एकाच ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत.काही वर्षे झाली की बदली होत असते पण या ठोक मानधनावर काम करणारे गेली सात-आठ वर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून आहेत.यातील काही मैला गाडी घेऊन खाजगी मैला गोळा करुन याला कोमनपाची कोणतीही परवानगी नसताना खाजगी मैला गोळा करून तो क. बावडा रोडवर असलेल्या ठिकाणी टाकत असल्याचे समजते.तसेच गेले दोन दिवस कचरा पेटत असल्याचे माहिती असून त्याच्या कडे या कामाचा चार्ज असून त्यांचे या कडे दुर्लक्ष करून वॉर्डातच जास्त लक्ष असल्याचे दिसून येत आहे.यातील काहीनी आपल्या भागातील कर्मचारी त्या परिसरात असलेल्या स्मशानभूमीत बदली करून आणि स्मशानातील काही कर्मचारी आपला स्वार्थ साधत आपल्या वॉर्डात घेतले असल्याची समजल्याने या मुळे काही कर्मचारी वर्गात नाराजी पसरुन हा अधिकार त्यांना कोणी दिला अशी विचारणा होत आहे.तसेच यातील काही कर्मचारी हजर असताना सुध्दा त्याची प्रथम गैरहजर मांडून नंतर तडजोड करत असल्याचे काहीच्या निदर्शनास आले आहे.तसेच यातील संबंधितास हजेरी लावून घरी जात असल्याचे आणि त्या बदल्यात महिन्याला काही ठराविक रक्कम घेऊन पूर्ण हजेरी मांडत असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे . 

या मुळे याचा परिणाम प्रामाणिकपणे काम करीत असलेल्या कर्मचारी वर्गावर होत आहे.कारण वेळेत कचरा साफ सफाई करून सुध्दा वरिष्ठांच्या आणि नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागते .तर काही वेळा वरिष्ठांच्या कडुन कारवाईचा बडगा उगारला जातो.म्हणुन अशा मनमानी कारभार करीत असलेल्यावर आणि आपल्या पदाचा स्वतःच्या स्वार्था साठी वापर करून प्रामाणिकपणे काम करीत असलेल्यांना त्रास देणारयांचा वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी कर्मचारी वर्गातुन होत आहे तसेच हा प्रकार भयानक असून याला मा.आयुक्तसो यांनी जातीने लक्ष घालून अशाची चौकशी करुन कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

तसेच यातील काही कर्मचारी यांची निवडणुक कार्यालयाकडे नेमणुक झाली असून त्या कर्मचारयांना अत्यावश्यक सेवेचे कारण सांगून त्या कर्मचारी वर्गाला त्यांचा संबंधित वरिष्ठ असलेला अटकाव करत असल्याचे समजते.

Post a Comment

Previous Post Next Post