घुबडाची तस्करी करणाऱ्यावर कारवाई.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - वन्य प्राण्यांची तस्करी करणारा सौरभ नामदेव पाटील (वय 23.रा.नाना पाटील नगर ,दुर्गमानवाड ता.राधानगरी ) या संशयीताला राजाराम पोलिसांनी रविवारी (ता.31) वैभव हौसिंग सोसायटीत सापळा रचून पकडून त्याच्याकडुन संरक्षीत प्रजातीच्या घुबडाची केली असून सौरभचा  आणि घुबडाचा ताबा वन विभागाकडे देण्यात आला.

वन्य प्राण्यांची तस्करी करणारा संशयीत वैभव हौसिंग सोसायटीच्या परिसरात घुबडाची विक्री करण्यासाठी येणार असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास अडसुळ यांना मिळाली असता त्या परिसरात सापळा लावण्यात आला.एक संशयीत तरुण दुचाकीवरुन पाण्याच्या टाकीजवळ आला असता त्याच्याकडे असलेल्या पुठ्याच्या बॉक्सची तपासणी केली असता त्यात तांबूस करड्या कलरचे घुबड आढ़ळले त्याने विक्री साठी आणल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी सशयीत सौरभला ताब्यात घेऊन या कारवाईत दुर्मिळ आणि संरक्षीत वन्य जीवाची तस्करी होत असल्याचे समजले.राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या सुचनेनुसार सहा.पोलिस निरीक्षक अडसुळ,पो.अं.हरिश सुर्यवंशी ,देवानंद बल्लारी आदीनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post