घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा रायगड यांच्या कडून पर्दाफाश



प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

धार मध्यप्रदेश येथून आरोपीस अटक करून सात लाखाचे दागिने जप्त करण्यात आले. काही दिवसांपूर्वी अलिबाग शहरात घरफोड्या झाल्या आहेत. सदर घरफोड्या उघड करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा रायगड समांतर तपास करीत आहेत .

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी अलिबाग पोलीस ठाणे गु.र.नं.42/2024 भा.द.वि.454,457,380 या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे सहा पोलीस निरीक्षक भास्कर जाधव व कर्मचारी पथक तयार करून सदर गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना दिल्या. सदर पथकाने सायबर सेलची तांत्रिक मदत घेवून गुन्ह्याचे आरोपी निष्पन्न केले. सदर आरोपी जिल्हा धार मध्यप्रदेश राज्य येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून वरिष्ठांच्या परवानगीने सहा. पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे व पथक धार मध्यप्रदेश याठिकाणी जावून सदर गुन्ह्यातील आरोपी नामे मडिया रायसिंग मकवाना रा. सिंगाचौरी ता. टाडा जि.धार राज्य मध्यप्रदेश यास शिताफीने ताब्यात घेतले त्यास सदर गुन्ह्यात अटक करून पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आले. त्याच्याकडे कसून तपास केला असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली देवून सदर गुन्ह्यतील चोरलेली मालमत्ता सोन्याचे दागिने हे सिंगाचौरी ता. टाडा जि.धार राज्य मध्यप्रदेश या ठिकाणी ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर सहा. पोलीस निरीक्षक भास्कर जाधव व कर्मचारी सदर आरोपीसह सदर ठिकाणी जावून एकूण 7,00,000/-रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आली आहे.

सदर आरोपीकडे त्याने आणखी काही गुन्हे केले आहेत का याबाबत कसून तपास करण्यात येत आहे .

सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे पोह/अमोल हंबीर, पोह/प्रतिक सावंत पोह/जितेंद्र चव्हाण, पोह/बाबासो पिंगळे, पोह/रुपेश पिंगळे, पोशी/अक्षय सावंत, पोशी/सचिन वावेकर, पोशी/भरत तांदळे, पोशी/लालासाहेब वाघमोडे पोशी/अक्षय जगताप, तसेच सायबर सेलचे पोना/तुषार घरत पोशी/अक्षय पाटील यांनी गुन्ह्याच्या तपासात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.


जन संपर्क अधिकारी


पोलीस अधीक्षक कार्यालय, रायगड अलिबाग

Post a Comment

Previous Post Next Post