ज्या गुंडांनी निखिल वागळेंवर हल्ला केला त्यांची परेड कधी काढणार ? खासदार संजय राऊत

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : पुण्यात पत्रकार निखिल वागळे , असिम सरोदे , विश्वंभर चौधरी यांच्यावर हल्ला झाला. पुण्याच्या नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी गुंडांची परेड काढून मोठा शो केला. मग ज्या गुंडांनी निखिल वागळेंवर हल्ला केला त्यांची परेड कधी काढणार ?  असा थेट सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत  यांनी पुणे पोलीस आयुक्तांना केला आहे.

पत्रकार निखिल वागळे यांचे वर हल्ला करणारे गुंड  कोण आहेत ,  कोणत्या पक्षाचे आहेत हे..?  आता पर्यंत त्यांची  परेड  व्हायला पाहिजे होती. निखिल वागळे, असिम सरोदे, विश्वंभर चौधरी यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर  अद्याप कारवाई का नाही झाली . मुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्या गुंडांचे समर्थन करत आहेत. या हल्ला करणाऱ्यांची देखील परेड काढली पाहिजे. त्यांनाही हातात बेड्या घालून रस्त्यावर फिरवा, तर तुम्ही पोलीस आयुक्त नाही तर तुम्ही भाजपचे कार्यकर्ते, असा घणाघात त्यांनी केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post