नॉन रेसिडेंट इंडियन्स पॅरेंट्स ऑर्गनायझेशन(नृपो)सदस्यांचा संक्रांत स्नेहमेळावा

 मेंटरशिप मधून पुढील पिढीची प्रगती: डॉ. मिलिंद पांडे 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : नॉन रेसिडेंट इंडियन्स  पॅरेंट्स   ऑर्गनायझेशन(नृपो) संस्थेच्या वतीने सदस्यांचा  संक्रांत स्नेह मेळावा शनिवार,दि.१७ फेब्रुवारी रोजी सकाळी साड़े नऊ वाजता  महाराष्ट्र राज्य  हाॅटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट चे 'यश रिजन्सी 'सभागृह,शिवाजीनगर येथे आयोजित करण्यात आला होता. 

या मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला.एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी चे कुलगुरू डॉ.मिलिंद पांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .डॉ.प्रचीती सुरु-कुलकर्णी यांनी 'मुक्ताई -एक मुक्ताविष्कार' हा कार्यक्रम सादर केला.सौ.वैदेही कुलकर्णी संपादित 'नृपोजगत्' या  अंकाचे प्रकाशन  या कार्यक्रमात डॉ. मिलिंद पांडे यांच्या हस्ते झाले .नृपो चे अध्यक्ष  बी.बी. कुलकर्णी यांनी स्वागत केले . नृपोच्या कामाची तसेच आगामी उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.

 सुरेश नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.विद्याधर कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.श्री.माहुलकर यांनी आभार मानले

डॉ. मिलिंद पांडे म्हणाले,' शैक्षणीक क्षेत्रात मेंटरशिप संकल्पना पुढे गेली पाहिजे.सर्व क्षेत्रात  आव्हाने वाढत आहेत. माईंड टू मार्केट, आयडिया टू इम्प्लीमेंटेशन झाले पाहिजे. सर्व समस्यांवर तंत्रज्ञानाची उत्तरे शोधली पाहिजेत. त्यातून देशाची प्रगती होईल. सरकारची भुमिका त्यात महत्वाची आहे.काम करण्याची मनोवृत्ती असेल, चांगले मेंटोर मिळाले तर रोजगार निर्माण होतील आणि देश समृद्ध होईल.स्टार्ट अप यशस्वी झाला नाही तरी हार न मानता त्यातून शिकून पुढे गेले पाहिजे. मधेच आत्मनिर्भरतेची कास सोडू नये.ज्यांची मुले परदेशात आहेत, अशा पुणेकरांना, ज्येष्ठ नागरिकांसाठी नृपो संस्था चांगले काम करीत आहे. हे नेटवर्क वाढत राहिले पाहिजे, असेही डॉ. मिलिंद पांडे यांनी सांगितले.

नृपो मधे योगदान देणाऱ्या ५ सदस्यांचा प्रातिनिधिक  सत्कार डॉ मिलिंद पांडे यांच्या हस्ते करण्यात आला




Post a Comment

Previous Post Next Post