केशव - माधव न्यासच्या स्पर्धेचे ज्ञानदा शाळेत बक्षीस वितरण



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : ५  फेब्रुवारी केशव-माधव न्यास तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नुकतीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर कर्वेनगर येथील ज्ञानदा शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली होती.ज्ञानदा संस्थेच्या सभागृहात हा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्वेनगर  संघचालक उदयन पाठक हे प्रमुख पाहुणे होते.विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पुस्तक व शिव प्रतिमा देण्यात आली.

केशव माधव न्यास चे सचिव अरविंद देशपांडे,विश्वस्त प्रकाश देशपांडे,नाट्यकर्मी कुलदीप धुमाळे,नितीन मुजुमदार,मोहन मोने यांची व्यासपीठावर मुख्य उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरवातीस नाट्यकर्मी कुलदीप धुमाळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांवरील कार्याची गौरवपर गीते गाऊन घेतली.तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाचे महत्व विषद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका स्वाती कुलकर्णी यांनी केले.आभार केशव-माधव न्यासाचे सचिव अरविंद देशपांडे यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वितेसाठी संस्थेचे कार्यवाह मंदार शेंडे,मीना पानसरे,जगदीश वाघ,सुनीता भोसले,दिनेशकुमार जगताप यांनी परिश्रम घेतले.

ज्ञानदा शाळेतील इयत्ता आठवी व नववी वर्गातील मुलां-मुलींनी ह्या स्पर्धेत भाग घेतला.विजेत्या विद्यार्थ्यांची नावे या प्रमाणे -

प्रथम पारितोषिक.-तन्वी कोळी,इयत्ता आठवी

द्वितीय -ऋतुजा पवार,इयत्ता ९ वी,

तृतीय - आर्या कवठेकर,इयत्ता आठवी,

चतुर्थ - अक्षरा कांबळे,इयत्ता आठवी,

पाचवे -अरुणा शितोळे,इयत्ता ९ वी,

सहावे - प्रगती हळब,इयत्ता आठवी.

उत्तेजनार्थ 

रुद्र सातपुते,आर्यन जाधव,भावेश पाटील,अभिजित मोरे (सर्व इयत्ता आठवी),संध्या पवळे,प्रिया वाहुळे,(सर्व इयत्ता ९ वी),

तनिष्क कवदे,सार्थक भुवड,साईराज शिंदे (सर्व इयत्ता सातवी)


फोटो ओळ

३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त  केशव माधव न्यास आयोजित निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे व विजेते विद्यार्थी.

Post a Comment

Previous Post Next Post