आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण, गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी



प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी सुनील पाटील :

उल्हासनगर मध्ये झालेल्या गोळीबारानंतर आमदार गणपत गायकवाड कोर्टात हजर करण्यात आले होते. आमदार गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे . 

या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता व्हिडिओ कॉन्फरंसद्वारा हजर न करता प्रत्यक्षात गणपत गायकवाड यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. तसेच यावेळी पोलिसांनी गणपत गायकवाड यांची 14 दिवसांची पोलीस कोठडी कोर्टाकडे मागण्यात आली आहे.   

न्यायाधीश ए.ए निकम यांच्या बेंचसमोर ही सुनावणी घेण्यात आली. गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला असल्याची माहिती यावेळी पोलिसांनी कोर्टात दिली. त्यानंतर गणपत गायकवाड यांची बंदूक पोलिसांकडून जप्त करण्यात आली. तसेच या प्रकरणात आम्हाला सखोल चौकशी करायची असून फरार आरोपींचा देखील आम्हाला शोध घ्यायचा आहे,

 असंही पोलिसांनी कोर्टात सांगितलं. घटनेचं सीसीटीव्ही कसं बाहेर गेलं असा सवाल गणपत गायकवाड यांचे वकिल राहुल आरोटे यांनी कोर्टात उपस्थित केलाय. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या केबिनमधील सीसीटीव्ही लिक होतं. हे जाणून बुजून करण्यात आलंय, असा दावा देखील वकिलांनी यावेळी केला.

या दोन्ही गटात आधी बसून सुरू असलेल्या चर्चेत अचानक वातावरण तापलं आणि आमदार गणपत गायकवाड यांनी थेट पिस्तुल काढून गोळीबाराला सुरूवात केली. महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना या गोळीबारात गोळ्या लागल्या. गोळीबाराचा आवाज ऐकल्यावर तातडीने एका पोलिसाने आत धाव घेतली. मात्र तोवर आमदार गायकवाड हे महेश गायकवाडला मारहाण करत होते. त्यांना रोखण्याचा पोलीस कर्मचाऱ्याने प्रयत्न केला.

Post a Comment

Previous Post Next Post