मदरसाचे बांधकाम पाड़त असताना या शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गणी आजरेकर आणि यासीन बागवान यांच्यासह 600 जणांवर गुन्हा.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने लक्षतीर्थ परिसरात असलेल्या मदरसावर कारवाई करीत असताना अधिकारयांशी वाद विवाद करून जमाव बंदी झुगारून नागरिक,महिलासह एकत्रितपणे कारवाईस विरोध करून शासकिय कामात अडथळा करून आणि महानगरपालिका परिसरात तेथील लोकांना एकत्र करुन वाहतुकीस अडथळा करून घेराव घातल्या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी गणी आजरेकर व यासीन बागवान यांच्यासह 600 जणांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर कायेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

यातील यासीन बागवान याने आपल्या मोबाईलवर वादग्रस्त स्टेटस ठेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आणि समाजात धार्मिक तेढ़ वाढ़वण्याचा प्रयत्न केला होता.जिल्हा न्यायालयाने या कामी केलेला मनाई आदेश नामंजूर केल्याने महापालिका अधिकारी आणि कर्मचारी पोलिस प्रशासनासह कारवाई करण्यासाठी गेले असता गणी आजरेकर यांच्यासह तेथील नागरिकांसह महिलांनी कारवाईस विरोध करीत रस्त्यातच बसून राहिले होते.या यातील काही जण अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह पोलिसांच्याही अंगावर जाण्याचा प्रयत्न केला होता.यामुळे शहरात ठिकठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.आज लक्ष्मीपुरी पोलिसांनी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस निरिक्षक दिलीप पवार यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post