पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन

 भेसळयुक्त शिंदी विक्रीची सर्व दुकान बंद करण्याच्या मागणी

प्रेस मीडिया लाईव्ह :

सांगली : सांगली जिल्ह्यातील सर्व भेसळयुक्त शिंदी विक्रीची  दुकाने बंद करण्याच्या मागणीसाठी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष शिवश्री सत्वशील पाटील यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज पासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे

 मिरज येथील शिवाजी स्टेडियम समोरील झोपडपट्टी लगत असणारा सिंधी चा अड्डा हा सर्वसामान्य जनतेच्या जीवाची खेळण्याची जागा झाली आहे त्या शिंदी मध्ये माणसांना नशा होण्यासाठी बऱ्याच प्रकारचे अमली पदार्थ वापरले जातात साप स्वच्छता या नावाखाली तर तिथे काहीच नाही पिण्याचे पाण्याच्या जागी लघवी करण्याचे ठिकाण आहे. पार्सल मधून जी सिंधी दिली जाते त्या प्लास्टिकच्या बाटल्या स्थानिक हॉटेलमधून गोळा करून आणल्या जातात बाटल्यांना कोणत्याही प्रकारे स्वच्छ केले जात नाही कोरोना काळामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळला जात होता पण एक दुसऱ्याच्या वापरलेल्या बाटल्या हे पार्सल साठी वापरतात. झाडावरून काढल्यापासून ती सिंधी 24 तासा नंतर नष्ट करायचे असते ती केली जात नाही. शिंदीच्या अड्ड्यामध्ये सिंधी कमी आणि गांजा जास्त ओढला जातो. गांजाचा परवाना सिंधी मालकाकडे आहे काय असे विचार न करता त्यांचे कर्मचारी सांगतात आमचे हप्ते प्रशासनाला जातात. हे हप्ते नेमके कोणाला जातात प्रशासनालाच माहीत. चार ते पाच दिवस एखाद्या व्यक्तीला शिंदी  न मिळाल्यास त्याची मानसिक संतुलन बिघडण्यास सुरुवात होते लोक वेड्यासारखी करायला लागतात शिंदी न मिळाल्यामुळे म्हणजेच यात काहीतरी अमली पदार्थ मिसळला जातो हे तितकेच खरे. भेसळयुक्त शिंदी मुळे हजारो घरे उध्वस्त झाली आहेत याची सखोल तपासणी व्हावी व दोषींना योग्य ती शिक्षा मिळावी आणि तत्काळ अशा सिंधी अड्ड्यांवर कारवाई करून ते बंद करण्यात यावे अशी मागणी आंदलेनकर्ते  सत्वशील पाटील यांनी केले आहे .

. त्यांनी माहिती अधिकाराखाली अन्न भेसळ प्रशासन व एक्साईज डिपार्टमेंट यांना मी सिंधी कशी बनवली जाते व ती कोणत्या प्रकारे बनवले जाते याची सखोल माहिती .माहिती अधिकाराद्वारे मागितली होती व मागील केलेल्या चाचण्यांचे रिपोर्ट सुद्धा मागितले होते... अन्न प्रशासनाची चाचणी प्रयोग शाळा  चार वर्षे झाले बंद आहे मग हे चाचणी करतात कुठे आणि आम्हाला रिपोर्ट देणार कुठून त्यासाठीच ते माझी दिशाभूल करून  उलटी सुट्टी कागदपत्र देण्याचा प्रयत्न करत आहेत. जनतेचे जीवाशी खेळणाऱ्या अशा कारभाराला सरकार आळा घालणार काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे

टी डी फाय च्या नियमानुसार दर चार वर्षाला शिंदीच्या झाडांची मोजणी केली जाते. सांगली जिल्ह्यात 16 दुकाने आहेत प्रत्येक दुकानासाठी 100 झाडे ही नियमाने असावीत ती आहेत काय. म्हणजे 16 दुकान तर सोळाशे झाड. एका झाडापासून किमान दोन ते अडीच लिटर शिंडी निघते म्हणजे सोळाशे झाडांची 3200 ते 3500 एवढी शिंडी निघते पण.. एका दुकानातून विक्री दोन हजार लिटरची आहे तर 16 दुकानातून 32000 लिटर शिंदी विकली जाते. जर नियमाप्रमाणे 3200 ते 3500 लिटर शिंदी झाडांपासून निघत असेल तर 32000 लिटर सिंधी कशी बनवली जाते. हा प्रश्न विचारताना कोणत्याही डिपार्टमेंटने आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलेले नाही आमची दिशाभूल करण्याचे काम केलेला आहे

 ह्या भेसळयुक्त शिंदी मुळे अनेक परिवार उध्वस्त झाले आहेत त्या शिंदी मध्ये बऱ्याच प्रकारच्या आमली पदार्थ मिसळले जातात. त्यामुळे सिंधी पिणाऱ्या माणसाला चार दिवस शिंदी न मिळाल्यास तो वेड्यासारखा करायला लागतो म्हणजेच याच्यामध्ये काहीतरी अमली पदार्थ मिसळला जातो संबधीत सर्व भेसळयुक्त शिंदी विक्री दुकाना वर तात्काळ कठोर कारवाई करून दुकाने त्वरीत बंद करावीत अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सत्वशील पाटील यांनी दिला आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आरपीआय चे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे आरपीआयचे शहर जिल्हा उपाध्यक्ष सचिन सकटे वंचित बहुजन आघाडीचे मिरज शहराध्यक्ष सतीश शिकलगार कुमार सातपुते अमोल हांगे हेमंत सातपुते अकबर सय्यद आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post