पुणे व ठाणे येथे नमो रोजगार मेळाव्याचे आयोजन

 इच्छुकांनी लाभ घेण्याचे आवाहन

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने  राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळावा - हायलँड ग्राऊंड, ढोकाळी, माजिवडा, ठाणे (पश्चिम) येथे दि. 29 फेब्रुवारी 2024 व दि. 1 मार्च 2024 रोजी होणार आहे. पुणे विभागीय विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे दिनांक 2 मार्च 2024 रोजी "नमो महारोजगार मेळाव्याचे" आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यामध्ये विविध औद्योगिक आस्थापना व उद्योजक सहभागी होणार असल्याने सर्व उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त संगीता खदांरे यांनी दिली आहे.

नोकरीस इच्छुक उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टिने जिल्ह्यातील सर्व खासगी आस्थापना, उद्योजकांनी आपल्याकडे उपलब्ध असलेली रिक्तपदे www.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर अधिसूचित करावीत.

उमेदवारांनी अधिक माहितीसाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या www.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळास भेट द्यावी. नोंदणीकृत असलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांचे प्रोफाईल अद्यावत करावे. या महारोजगार मेळाव्यामध्ये किमान 10 वी, 12 वी, कोणत्याही शाखेतील पदवीधर, अभियांत्रिकी पदवीका, आय.टी.आय इत्यादी पात्रता असणारे उमेदवार पात्र असणार आहेत. या रोजगार मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीकरीता त्यांचा बायोडेटा व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतिसह नमो महारोजगार मेळाव्याच्या ठिकाणी ठाणे, बारामती येथे प्रत्यक्ष उपस्थित रहावे.

तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर या कार्यालयास 2031-2545677 या दुरध्वनीवर संपर्क साधावा.

Post a Comment

Previous Post Next Post