अतिग्रे येथील माननीय श्री महादेव चौगुले हे राज्यस्तरीय महा गौरव पुरस्काराने सन्मानित


प्रेस मीडिया लाईव्ह :

  पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी : भरत शिंदे

   सिद्धगिरी कनेरी मठ कोल्हापूर येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र यांचे दुसरे राज्यस्तरीय महा अधिवेशन 2024 पार पडले यावेळी अतिग्रे तालुका हातकणंगले येथील माननीय श्री महादेव शिवाप्पा चौगुले यांना डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने राज्यस्तरीय महा गौरव पुरस्कार 2024 पुरस्कार प्राप्त झाला त्यांना हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार साहेब यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले .


संस्थापक तुषार उद्योगसमूह अतिग्रे येथील श्री महादेव शिवाप्पा चौगुले यांनी कमवा आणि शिका योजनेतून आपले शिक्षण पूर्ण करत घरातील जबाबदारी पार पाडण्यासाठी शिकवण्या घेणारा एक तरुण अचानक कुक्कुटपालनाच्या व्यवसायाचा ध्यास घेतो कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी, व त्यांना त्यांच्या  पत्नीची साथ च्या जोरावर कृषी पूरक उद्योगाची नवी शुंक्लाच निर्माण केली ही किमया साधली आहे अतिग्रे तालुका हातकणंगले येथील श्री महादेव शिवाप्पा चौगुले यांनी पोल्ट्री व कॅटल फिड्स, ब्रिडर फार्म, पोल्ट्री हचरिच, पोल्ट्री बर्डस, इंटिग्रेशन बॉयलर बर्डस ,ट्रेडिंग, आधी मध्ये नवा मानदंड निर्माण केला आहे शेळी प्रकल्प, गाय आणि म्हशीचा गोठा, प्रकल्प निर्माण करत डेअरी उद्योगाची प्रगती साधली आहे त्यांच्या डेअरी प्रकल्पात निर्माण होणारे अविट चवीचे दुग्धजन्य पदार्थ अत्यंत लोकप्रिय बनली आहेत पोल्ट्री व कृषी उद्योग क्षेत्रातील अग्रेसर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख बनली आहे

     या कार्यक्रमा वेळी उपस्थित मान्यवर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब ,अभिनेता माननीय श्री गिरीश कुलकर्णी, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना संस्थापक अध्यक्ष माननीय राजा माने ,तसेच डिजिटल मीडिया चे सर्व पदाधिकारी, राज्यातून आलेले सर्व पत्रकार बंधू ,व पुरस्कार  कर्ते उपस्थित होते

     माननीय श्री महादेव चौगुले यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अतिग्रे गावातून त्यांचे मोठे कौतुक केले जात आहे व त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत 

 

Post a Comment

Previous Post Next Post