कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात औद्योगिक ग्राहकांसाठी स्वागत कक्ष सूरू


प्रेस मीडिया लाईव्ह :

संभाजी चौगुले :

कोल्हापूर परिमंडळ: औद्योगिक ग्राहकांना तत्पर व दर्जेदार सेवा देणेकरीता महावितरणमार्फत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात 'स्वागत कक्ष' सुरू करण्यात आले आहेत. या कक्षाचे नोडल अधिकारी कार्यकारी अभियंता तर व्यवस्थापक (वित्त व लेखा) व उपकार्यकारी अभियंता हे सदस्य आहेत. 

नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभारसंबंधी स्वागत सेलकडे मागणी नोंदविल्यानंतर संबंधित औद्योगिक ग्राहकांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे, शुल्क आदींची माहिती दिल्या जाईल. दोन कार्यालयीन दिवसांत कागदपत्रांची पुर्तता, ऑनलाइन अर्ज व प्रक्रिया शुल्क भरण्याची कार्यवाही महावितरणकडून ग्राहकांच्या दारी जाऊन केली जाईल. त्यानंतर लगेचच स्थळ पाहणीच्या तांत्रिक अहवालानुसार फर्म कोटेशन देण्यासह नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरु होईल. यासोबतच वीजसेवा किंवा बिलिंगच्या प्राप्त तक्रारींचे सेवेच्या कृती मानकांप्रमाणे निश्चित केलेल्या कालावधीत किंवा त्यापूर्वीच निराकरण करण्यात येणार आहे.

औद्योगिक ग्राहक महावितरण सेवांचा लाभ घेण्यासाठी स्वागत कक्षाशी संपर्क साधू शकतात. नोडल अधिकारी यांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे कोल्हापूरकरिता - ७८७५७६९००४ तर सांगलीकरिता - ७८७५७६९०१२ असे आहेत. तरी औद्योगिक ग्राहकांनी स्वागत कक्षाचा लाभ घ्यावा, असे महावितरणचे आवाहन आहे.

Post a Comment

Previous Post Next Post