लाचखोर लिपीकास दंडासह पाच वर्षे सक्तमजुरी.



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- कोल्हापुरातील आरोग्यसेवा कार्यालयातील वरिष्ठ लिपीक मिलिंद रामचंद्र हावळ याने महाबळेश्वर येथील रुग्णालयात नोकरी लावतो म्हणुन 10 हजारांची लाच स्विकारली होती.ह्यांना जिल्हासत्र न्यायालयाने दोषी ठरवून मिलिंद हावळ यांना 5 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजारांचा दंड ठोठावला.

   अधिक माहिती अशी की ,11/12/2012साली कोल्हापूर येथे आरोग्यसेवा उपसंचालक कार्यालयात सापळा रचून लाचलुचपतच्या पथकाने कारवाई केली होती.जिल्हा सत्र न्यायाधीश  एस.आर .साळुखेसो यांच्या कोर्टात सुनावणी झाली होती .या खटल्यात सरकारी वकील म्हणुन Ad. ए.एस.पिरजादे यांनी काम पाहिले.तक्रारदाराने नोकरी साठी अर्ज या कार्यालयाकडे केला होता.त्याच्या नेमणुकी साठी हावळ यांनी लाचेची मागणी केली होती.लाचलुचपतच्या पथकाने हावळ यांच्या विरोधात दोषारोप पत्र दाखल केले होते.या खटल्यात 5 साक्षीदारांचा जबाब आणि Ad.पिरजादे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य मानुन न्यायालयाने शिक्षा सुनावली.

Post a Comment

Previous Post Next Post