भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा इचलकरंजीच्या वतीने २४ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान भव्य "नमो चषक २०२४" चे आयोजन

 - भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड.

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : "नमो चषक २०२४" च्या माध्यमातून मातीतल्या क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना व्यासपीठ देणारी राज्यस्तरीय कला क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव स्पर्धेचे आयोजन कामगार मंत्री मा. ना. श्री सुरेश खाडे तसेच प्रदेश उपाध्यक्ष मा. आमदार सुरेश हाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चा तर्फे मातीतल्या क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना व्यासपीठ देण्याकरिता महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभा क्षेत्रे नमो चषक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. केंद्रामध्ये २०१४ मध्ये भाजपा सरकार आले पासून सर्व क्षेत्रासह खेळामध्येही आमूलाग्र चांगले सकारात्मक बदल घडले.


खेलो इंडियाच्या रूपाने देशातील खेळाडूंना प्रोत्साहन बळ मिळाले आहे. त्याच धर्तीवर नमो चषक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव इचलकरंजी विधनसभा क्षेत्रातमध्ये नमो चषकाचे आयोजन केले आहे. नोंदणीसाठी वेबसाईटवर जाऊन स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घ्यावे, असे आवाहन केले होते. शालेय, महाविद्यालय खेळाडूंचा चांगला प्रतिसाद मिळाला असून या स्पर्धेमध्ये सर्व वयोगटातील खेळाडू असून सुमारे शालेय व महाविद्यालयातुन ६३ हजार खेळाडूंची नोंद झाली आहे.

स्पर्धामध्ये स्केटिंग, बुद्धिबळ, व्हॉलीबॉल, कबड्डी, कुस्ती, क्रिकेट, बैलगाडी शर्यत या क्रीडा स्पर्धा आहेत. तसेच सांस्कृतिक विषयांत रांगोळी या स्पर्धा खुल्या गटात स्पर्धा होणार आहेत.

या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या इचलकरंजी परिसरातून खेळाडूंना चांगल्या प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाने केलेला आहे. खेळाडूंना तालुका, जिल्हा, राज्य अशा विविध पातळीवर खेळण्याची संधी दिली जाणार आहे. ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असून विजयी स्पर्धकांना आकर्षक बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. या नमो चषक स्पर्धेला २४ फेब्रुवारी २०२४ पासून ४ मार्च २०२४ पर्यंत होईल, स्पर्धेचे ठिकाण व वेळ रजिस्टर केलेल्या खेळाडूंना मोबाईल नंबरवर कळविली जाईल. सर्व स्पर्धेचे नियोजन, आयोजन भारतीय जनता पार्टी, महिला आघाडी, युवा मोर्चासह सर्व आघाडी कार्यकर्ते पदाधिकारी मान्यवरच्या उपस्थित होणार आहेत. अशी माहिती भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड यांनी दिली. यावेळी शहराध्यक्ष पै. अमृत भोसले, सर चिटणीस राजेश रजपुते, बालकृष्ण तोतला, भाजपा महिला आघाडी सौ. अश्विनी कुबडगे तसेच कार्यक्रमाचे संयोजक आशिष खंडेलवाल, युवा मोर्चाचे चिदानंद कोटगी, सचिन पवार, मनोज तराळ, नितीन पडियार, हेमंत वरुटे, प्रविण बनसोडे, कुमार शिंदे, रविंद्र घोरपडे, उमेश गोरे, श्रेयश गट्टानी, उमाकांत दाभोळे, प्रविण पाटील, विपुल खोत, महेश पाटील, अनिस म्हालदार, यश वायचळ, सुरज आडेकर, सिताराम ओझा, संभाजी शिंगरे पदाधिकारी व सर्व आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.


24 फेब्रुवारी शनिवारी सकाळी आठ वाजता शिवतीर्थ येथे प्रदेश उपाध्यक्ष मा.आमदार सुरेश हाळवणकर यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ होईल

दिनांक 24 रोजी स्केटिंग स्पर्धा

 दिनांक 28 रोजी रांगोळी स्पर्धा दिनांक 29 बुद्धिबळ स्पर्धा दिनांक 2 मार्च कबड्डी स्पर्धा दिनांक3 मार्च कुस्ती

दिनांक 4 मार्च रोजी हॉलीबॉल स्पर्धा होऊन स्पर्धेचा बक्षीस समारंभ कार्यक्रम नामदार कामगार मंत्री मा. सुरेश खाडे यांच्या हस्ते व प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होईल 

सर्व स्पर्धा जय हिंद मंडळसह महानगरपालिकेचे मंगलधाम, वेद भवन शिवतीर्थ परिसर येथे होतील

Post a Comment

Previous Post Next Post