संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये "उमंग २०२४" अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन


प्रेस मीडिया लाईव्ह :

पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी : भरत शिंदे

अतिग्रे शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव भारताच्या कानाकोपऱ्यात पोहचविलेल्या संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये “उमंग २०२४ विविध कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, पारंपरिक, कौशल्य विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचे आयोजन २६ फेब्रुवारी ते २ मार्च २०२४ या कालावधीत इन्स्टिट्यूटच्या ग्रीन कॅम्पस भव्य प्रांगणात करण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धा, इन्स्टिट्यूट अंतर्गत  डान्स, सिंगिंग, ड्रामा, फॅशन शो, ट्रॅडिशनल डे, मराठी भाषा गौरव दिन, मेहंदी, डिबेट, रांगोळी, नेलं-आर्ट, हेअरस्टाईल स्पर्धा, काव्य वाचन, एक्सटेम्पोर, कुकिंग विदाऊट फायर,  इत्यादी कार्यक्रम आणि स्पर्धा आयोजन करण्यात आलेले आहे.

संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, डॉ. विराट गिरी यांच्यासोबत चर्चा केली असता ते म्हणाले या इन्स्टिट्यूट मध्ये इंजिनिअर सोबत  सक्षम भारताचे नागरिक घडविले जात आहेत. ज्यामध्ये सर्व गुण संपन्न असे विद्यार्थी परिपूर्ण करून देशाच्या विकासाला हातभार लावतील असी क्षमता विद्यर्थांच्या आंगी विकसित केली जात आहे. संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये  डिग्री, डिप्लोमा, आयटीआय, अल्पमुदतीचे अभ्यासक्रम. असे एकूण १५०० हूनअधिक  विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पालकाचा आणि विद्यार्थ्यांचा विश्वास या संस्थेवर असून विद्यर्थांना सक्षम बनवण्यासाठी सर्व मार्गदर्शक प्राध्यापक आणि कर्मचारी तत्परतेने कार्यरत आहेत. “उमंग २०२४”  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख समन्वयक प्रा. सुहास पाटील, प्रा. सागर चव्हाण, प्रा. नितीन पाटील, प्राध्यापिका रईसा मुल्ला सर्व कमिटी प्रमुख प्राध्यापक आणि  टीम परिश्रम घेत आहेत.

संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष श्री संजयजी घोडावत विश्वस्त विनायक भोसले "उमंग २०२४" या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या आहेत.



Post a Comment

Previous Post Next Post