युवा पिढीने समाज माध्यमांचा उपयोग नवनिर्मितीसाठी करावा: डॉ. गिरीश मोरे



प्रेस मीडिया लाईव्ह :

संभाजी चौगुले :

हुपरी- जनता शिक्षण प्रसारक मंडळ हुपरी संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, हुपरी येथे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत दि. ०८ फेब्रुवारी २०२४ रोजी "समाज माध्यमे आणि भावी पिढी" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. समन्वयक प्रा. डॉ. सुशिलेंद्र मांजर्डेकर यांनी प्रास्ताविक केले. 

जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. आण्णासाहेब शेंडूरे  यांनी उद्घघाटकीय  मनोगतात उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे सचिव मा. बाळासाहेब वामन आचार्य, मा. सुदर्शन भोजे, कॉलेजचे प्राचार्य भोसले सर मा. डी. बी. तोडकर, यांनी कार्यशाळेसाठी प्रमुख उपस्थित दर्शविली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. प्रज्ञा माने यांनी करून दिला. कार्यशाळेचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. गिरीश मोरे मराठी विभाग, राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय, रूकडी यांनी आपल्या मार्गदर्शनातून "फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, युट्युब व व्हाट्सअप इत्यादी आधुनिक समाज माध्यमांचा उपयोग करून युवा पिढीने देशात नवनिर्मिती करावी" असे मौलिक मार्गदर्शन केले. 

अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. संतोष भोसले होते. या कार्यशाळेस क्लस्टर मधील ०४ महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि ६० विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून कार्यशाळेच्या आयोजन आणि संयोजनाचे अभिनंदन केले. सूत्रसंचलन कु. आरती देशमुख आणि कु. वैभवी कौलवकर यांनी केले. प्रा. स्नेहा जगताप यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, विद्यार्थी व प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post