शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा १२ फेब्रुवारी मोर्चा तर २० पासून काम बंद आंदोलन


प्रेस मीडिया लाईव्ह :

संभाजी चौगुले : 

राज्यातील शिक्षकेतर कर्मचा-यांचे प्रलंबित प्रश्नांबाबत ८ दिवसात प्रश्न सोडविणेचे आश्वासन देवूनही पुर्तता न केल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर संघटनांच्या महामंडळाच्या वतीने राज्यव्यापी मोर्चाचे आयोजन १२ फेब्रुवारी रोजी पुणे येथे केलेले आहे.महामंडळाचे अध्यक्ष अनिल माने, सर कार्यवाह शिवाजी खांडेकर, कार्याअध्यक्ष मोरेश्वर वासेकर यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाचे आयोजन करणेत आले आहे.

मोर्चाचा मार्ग शनिवार वाडा ते शिक्षण संचालक, शिक्षण आयुक्त कार्यालय सेंट्रल बिल्डींग असा असणार आहे. याबाबत शासनाने कोणतेही गंभीर दखल घेतली नसल्यास २० फेब्रुवारी पासून राज्यातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी काम बंद आंदोलन करणार असलेचे निवेदनात म्हटले आहे. 

याबाबत निवेदनात म्हटले आहे की, ७ जानेवारी रोजी झालेल्या शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या अधिवेशनात शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी उपस्थित राहून शिक्षकेतर कर्मचारी यांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे १०-२०-३० आश्वासित प्रगत योजना लाभासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अन्य प्रश्न ८ दिवसात त्वरीत निकाली काढून असे आश्वासन दिले होते. याबाबत शासनाकडून कोणतीही सकारात्मक हालचाल दिसून येत नाही. 

किंबहुना याबाबत काय वस्तुस्थिती आहे याची माहितीही संघटना पदाधिकाऱ्यांना दिली जात नसलेने नाईलाजास्तव सोमवार दि.१२ फेब्रुवारी मोर्चाचे आयोजन केले आहे. तसेच मंगळवार दि.२० फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करण्यात येणार असलेचे निवेदनात म्हटले आहे. पुणे येथे होणाऱ्या मोर्चासाठी कोल्हापूर जिल्हयातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील व सचिव मनोहर जाधव यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post