कशिश प्रोडक्शन कोल्हापूर निर्मित या मराठी चित्रपटाचा के.आय. टी कॉलेज येथे शुभारंभ



प्रेस मीडिया लाईव्ह :

 हेरले प्रतिनिधी / संदीप कोले 

कशिश प्रोडक्शन,कोल्हापुर निर्मित 'प्रलय 'या मराठी चित्रपटाचा शुभारंभ उद्योगपती व निर्माता सरदार आवळे व ज्योती आवळे यांच्या शुभ हस्ते के.आय.टी.कॉलेज कोल्हापुर येथे करण्यात आला. 

या चित्रपटात बापाने आपल्या मुलीसाठी उल्लेखनीय कामगिरी करणारी कहाणी आहे असे मत लेखक हिरालाल कुरणे यांनी सांगितले.यावेळी जेष्ठ मार्गदर्शक जी.जी.आवळे, के.आय.टी.कॉलेज संचालक डॉ मोहन वनरोटी ,लेखक हिरालाल कुरणे, वर्षा कुरणे,दिग्दर्शक सचिन वारके ,कार्यकारी निर्माता राहुल मोरे,शैलेश शिंदे ,डॉ.जितेंद्र भाट, हातकणंगले वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष अशपाक देसाई

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सरचिटणीस मुनीर जमादार ,राजेश जाधव,संजय हणमंत,प्रतीक आवळे,अनुराधा धामणे,विजय पाटकर,दीपक खटावकर,सचिन सुतार, अयुब इंगळीकर,अविनाश पवार,संतोष कसबे,आशुतोष आवळे,नंदकुमार जाधव ,रोहन आवळे,स्वप्नील आवळे, संदीप कांबळे,अमित कांबळे यांच्यासह कलाकार,विद्यार्थी, ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post