शरद मोहोळ, विठ्ठल शेलार, भाजप आणि गुंडगिरी

 थोडक्यात भाजप मुळे पुण्याचा बिहार होत आहे ! 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : एकेकाळी "चाल - चरित्र - चेहरा" अशी टॅगलाईन असलेली भारतीय जनता पार्टी आता मात्र भ्रष्ट आणि गुंड लोकांची पार्टी बनलेली आहे. इतर पक्षातील भ्रष्ट नेत्यांनी "भाजप वॉशिंग मशीन" मध्ये डुबकी मारली की त्यांच्यावरची ईडी, सीबीआय, पोलीस यांच्या कारवाया थांबतात  आणि त्यांना कोणतीही भीती न वाटता रात्री छान झोप लागते, हे बहुतेकांना माहिती आहे. म्हणूनच प्रचंड मोठ्या संख्येने भ्रष्ट नेते भाजपमध्ये प्रवेश घेत आहेत... आणि भाजप देखील अशा भ्रष्ट लोकांना राजाश्रय देण्याचं काम करत आहे. 

सत्ता टिकवण्यासाठी भ्रष्ट लोकांचा पाठिंबा कमी होता म्हणून की काय भाजपने उघडपणे गुंडांना, गँगस्टर लोकांना आश्रय देण्याचं काम सुरू केलं आहे. 

पुण्यातील कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ यांच्या पत्नीचा भाजप प्रवेश कोथरुडचे आमदार व पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, तत्कालीन भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक  यांच्या उपस्थितीत गेल्यावर्षी एप्रिल २०२३ मध्ये पार पडला. शरद मोहोळच्या पत्नीला भाजपतर्फे येत्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक पदाचे तिकीट देण्यात येणार आहे, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. 

अलीकडेच दिवसाढवळ्या कोथरूडमध्ये शरद मोहोळची हत्या करण्यात आली. या हत्येचा मास्टरमाईंड हा गँगस्टर विठ्ठल शेलार आहे अशी बाब काल प्रसिद्धी माध्यमातून उघड झाली आणि विठ्ठल शेलार व त्यांच्या साथीदारांना पोलिसांनी सदर प्रकरणी अटक केल्याची बाब देखील पोलिसांनी स्पष्ट केली आहे. सदर गॅंगस्टर विठ्ठल शेलार याचा भाजपमधील पक्षप्रवेश जानेवारी २०१७ मध्ये भाजपचे तत्कालीन पालकमंत्री व पुण्याचे माजी खासदार कै  गिरीश बापट व आमदार बाळासाहेब भेगडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. तसेच गँगस्टर विठ्ठल शेलार याला भोर -वेल्हा- मुळशी भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्षपद देण्यात आले होते. 

म्हणजे भाजपशी संबंधित असलेल्या एका गँगस्टर शरद मोहोळची हत्या करण्यामागे भाजपशी संबंधित असलेला दुसरा गँगस्टर विठ्ठल शेलार हा मास्टर माईंड होता. आणि या दोघांशी संबंधित पक्षप्रवेश भाजपचे त्यावेळचे नेते व तत्कालीन पालकमंत्री यांच्या पुढाकाराने झाले होते, ही पुणेकरांसाठी अतिशय खेदाची बाब आहे. जे पुणे सुशिक्षित - सभ्य लोकांचे पुणे म्हणून ओळखले जाते, जे पुणे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते, जे पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते... त्या पुण्याचा असा होणारा ऱ्हास, अवमूल्यन हा सर्वसामान्य पुणेकरांना उद्वेग आणणारा आहे. 

आपल्या पुण्यात रात्री -अपरात्री माय-भगिनी सुरक्षितपणे फिरू शकतात अशी ओळख असलेल्या पुण्यामध्ये आता मात्र वाढती गुंडगिरी, कोयता गॅंग यामुळे नागरिकांच्या मनामध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे. 

पुण्यात गुंडागर्दीने, कोयता गॅंगने, वाढत्या हत्या व गॅंगवॉरने उच्छाद मांडलेला असताना गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कारवाई करण्याऐवजी त्यांना राजकीय  आश्रय देण्याचं पाप भाजप करत आहे आणि त्यामुळे पुण्याचा, विशेषत: कोथरुडचा, बिहार होत आहे. भाजपच्या साथीने पुण्यात होणारे राजकारणाचे गुन्हेगारीकरण थांबलेच पाहिजे! 


- डॉ. अभिजीत मोरे, 

आम आदमी पार्टी, कोथरूड, पुणे

Post a Comment

Previous Post Next Post