गंभीर मुद्दा : मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीच्या सर्वेक्षणासाठी पुणे महानगरपालिकेने नेमलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये अनेक मयत,

  सेवानिवृत्त, निलंबित कर्मचाऱ्यांचा नावाचा समावेश

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीच्या  सर्वेक्षणासाठी पुणे महानगरपालिकेने नेमलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये अनेक मयत, सेवानिवृत्त, निलंबित कर्मचाऱ्यांचा नावाचा समावेश आहे मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यासाठी शासन खरंच गंभीर आहे का? की, केवळ तोंड देखले सोपस्कार पार पाडले जात आहेत ?

महाराष्ट्र शासनाने राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम सोपविले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व ग्रामीण व शहरी भागातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे महानगरपालिकेकडील वर्ग- ३ मधील अधिकारी / कर्मचारी यांना सर्वेक्षण करण्याकरिता उपलब्ध करून देण्याचा  कार्यालयीन आदेश पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिनांक ११/१/२०२४ रोजी (अति.महा. आयुक्त (ज) कार्यालय, आस्थापना विभाग, पुणे मनपा, जा.क्र. : अतिमश्र/ साप्रवि/आस्था/११००२ ) काढला आहे.

या आदेशामध्ये मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांच्या यादीपैकी अनेक सेवानिवृत्त, मयत, निलंबित कर्मचाऱ्यांच्या नावाचा समावेश आहे, अशी माहिती आम आदमी पार्टीकडे प्राप्त झाली आहे.

उदाहरणार्थ - 

१) २३३ वर श्री संजय कोडिंबा गंगावणे- अतिक्रमण निरिक्षक दि. ३०/०७/२०२३ रोजी सेवा निवृत्त झालेले आहेत.

२) ८८६ वर श्री राजेश संभाजीराव खुडे अतिक्रमण निरिक्षक हे निलंबित झालेले आहेत.

३) ९४४ वर श्री नवनाथ रामचंद्र मोकाशी हे सेवक मयत आहेत.

*एवढ्या गंभीर चुका कशा काय होऊ शकतात ? या सर्वेक्षणाबाबत महाराष्ट्र शासन गंभीर नाही, असा याचा अर्थ घ्यावा का ? केवळ जनतेला दाखवण्यासाठी हे सोपस्कार पार पाडले जात आहे का ?* 

सदर माहिती खरी असल्यास ती प्रशासकीय पातळीवरील अतिशय गंभीर चूक असून सदर यादी बनवणाऱ्या व तपासणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, ही विनंती. मराठा आरक्षण संदर्भातील सर्वेक्षणाचा प्रश्न संवेदनशीलपणे हाताळला जावा व त्यामध्ये कोणतीही चूक होऊ नये अशी अपेक्षा आहे.तसेच सदर यादी मध्ये दुरुस्ती करून अजून काही मयत, निलंबित, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नावे असतील तर तीही तपासावी संबंधित कर्मचारी, अधिकाऱ्यांची सर्वेक्षणाची जबाबदारी योग्य त्या व्यक्तीला देण्यात यावी. मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्याचं काम विनाअडथळा, संवेदनशीलपणे पूर्ण करण्यात यावे, ही विनंती.

प्रति,

१) माननीय मुख्यमंत्री- महाराष्ट्र राज्य

२) माननीय उपमुख्यमंत्री - महाराष्ट्र राज्य

३) माननीय मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य

४) माननीय प्रधान सचिव, नगर विकास विभाग, महाराष्ट्र राज्य

५) माननीय श्री विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महानगरपालिका

६) माननीय श्री रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका

७) माननीय श्री सचिन इथापे,  उपायुक्त - सामान्य प्रशासन, पुणे महानगरपालिका


डॉ अभिजीत मोरे,

आम आदमी पार्टी, पुणे

9158494784

Post a Comment

Previous Post Next Post