बैलगाडी शर्यतीत बोलेरो सारखी गाडी उलटली , कागल येथील घटना.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कागल - काल एका नेत्याच्या वाढदिवसानिमीत्त सांगाव नाका परिसरात असलेल्या माळावर बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी शर्यत सुरू असताना बैलगाडीच्या पुढ़े बोलेरो सारखी गाडी जात असताना मातीत त्या गाडीचे चाक घसरुन उलटली यात काही जणांना किरकोळ दुखापत झाल्याचे समजते.

या घटनेची नोंद कागल पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती.या गाडीत कमीत कमी 20 ते 25 जणांनी गाडी भरलेली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शेवटी उपस्थित नागरिकांनी गाडी सरळ करून त्यातील काहीना बाहेर काढले.

Post a Comment

Previous Post Next Post