पुणे स्टेशन परिसरात एमडी हा अंमली पदार्थ विकण्यास आलेल्या शेबाज शब्बीर कुरेशी यास अटक



प्रेस मीडिया लाईव्ह : 

 पुणे : गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पुणे स्टेशन परिसरात एमडी हा अंमली पदार्थ विकण्यास आलेल्या शेबाज शब्बीर कुरेशी (२४, रा. कॅम्प चाळ)  याला अटक केली असून  त्याच्याकडून १ लाख ६९ हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे .

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदशानाखाली उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, अंमलदार चेतन गायकवाड, संदीप जाधव, रविंद्र रोकडे, महेश साळुंखे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  त्याने हा अमली पदार्थ कोठून आणला तसेच तो कोणाला देणार होता, याचा तपास करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post