मोठी बातमी : तिप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्यारया टोळीवर एलसीबीची कारवाई .


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- तिप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्यारा अशोक बापू पाटील (रा.बेलवळे ,कागल).आणि त्याचे साथीदार महिला मेहरुम अल्ताफ सरकवास (वय 41.रा.घटप्रभा) आणि सलील रफिक सय्यद यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने छापा टाकून ताब्यात घेऊन त्यांच्यावर कागल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की,हे तिघे कर्जबारी आणि गरजू लोकांना हेरुन त्या लोकांची फसवणूक करीत होते.याची माहिती कोल्हापूर जिल्हा पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांना मिळाली असता त्यानी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.ह्या टोळीतील अशोक पाटील यांचे साथीदार असलेले मेहरुम सरकवास आणि सलील सय्यद यांना तळेगाव-दाभाडे ,पुणे येथील उमेश तुकाराम शेळके हे कर्जबाजारी असून त्यांना पैशाची गरज असल्याची माहिती मिळाली असता ह्या दोघांनी मिळून उमेश शेळके यांची भेट घेऊन नोटा कशा तयार होतात याचा व्हिडीओ दाखवून विश्वास संपादन करून त्यांना पैसे घेऊन येण्यास सांगितले असता शेळके आपल्या पत्नी समवेत कोल्हापुरात आले असता या दोघांनी बेलवळे येथील अशोक पाटील यांच्या फार्म हाऊसमध्ये घेऊन गेले.आम्ही दोघे अशोक पाटील यांच्याकडे कामास असून आणलेली रक्कम ताब्यात घेऊन त्या बदल्यात पाचशे नोट वर आणि खाली लावलेली आणि त्याच्या आत नोटाच्या साइजचे कोरे कागद लावलेले सहा बंडल देत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने छापा टाकून या तिघां टोळक्याना ताब्यात घेऊन त्यांच्या कडील 1,03,630 रुपये रोख रक्कमे सह व्होल्ट अयन्ड अय्म्प मशीन बॉक्स एक आणि लहान कटर असा एकूण 1 लाख 53 हजारांचा मुद्देमाल जप्त करून  त्यांच्यावर कागल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरील तिघां जणानी आणि कुणाची फसवणूक केली असल्यास त्यानी पोलिसांशी संपर्क साधावा.असे आवाहन पोलिस अधीक्षक मा.महेद्र पंडीत यांनी केले आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक मा.रविद्र कळमळकर आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर वाघ यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.


बनावट नोटा प्रकरणी कर्नाटकात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत

अशोक पाटील हा शिवसेना उध्दव ठाकरे गटाचा कागल तालुका प्रमुख असून त्याच्यावर बनावट नोटा प्रकरणी कर्नाटकात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत.तसेच त्याच्यावर गायरान जमीन हड्डप  केल्याचा आरोप आहे.

Post a Comment

Previous Post Next Post