सिंहगड रस्त्यावरील शिंदे मैदान येथे ऑलिम्पियन सर्कस सुरू


         


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : प्रख्यात ऑलिम्पियन सर्कस सिंहगड रस्त्यावरील वडगाव परिसरात फन टाइम थिएटरच्या मागे असणाऱ्या शिंदे मैदान येथे सुरू झाली असून, रोज दुपारी ४ व सायंकाळी ७ असे सर्कस शो असणार आहेत. शनिवारी व रविवारी अतिरिक्त दुपारी १ वाजतादेखील शो होईल. सर्कशीचा तंबू फायरप्रूफ असून, सर्कसच्या तंबूची आसनक्षमता १२०० आहे. ७५० रुपये अधिक जीएसटी ५०० रुपये, ३०० रुपये व २०० रुपये असे तिकीटदर आहेत. तीन वर्षांखालील बालकांना प्रवेशशुल्क नाही. पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था आहे.

या सर्कसमध्ये मेक्सिको, उझबेकिस्तान, रशिया यांसह देशातील सुमारे २५ कलावंत आहेत आणि एकूण ६० स्टाफ आहे. एकूण दोन तास चालणाऱ्या या सर्कसमध्ये चित्तथरारक कसरती हे वैशिष्ट्य आहे. रशियन रोलर बॅलन्स, रिंग अॅक्रोबॅटिक्स, कॉमिक जग्लिंग. हुल्ला हूप्स, सिल्क अॅण्डस रिंग, नेत्रदीपक सायकल कसरती, मोटारसायकल ग्लोब, मिस्टर स्लिंकी अॅक्ट्स, हंटर अॅक्ट्स, हेअर हँगिंग, स्प्रिंग नेट, तलवारीच्या टोकावरील बॅलन्स, अॅक्रोबॅटिक्स मणिपुरी, रंगतदार दोरीवरील उड्या, कॅण्डल बॅलन्स, क्विक चेंज, लेजरमॅन शो, कॉमेडी शोज्, अॅनिमल कस्टम्स, बटरफ्लाय कॉमेडी असे अनेक मनोरंजनाचे चित्तथरारक खेळ सर्कसमध्ये बघायला मिळतील.

सर्कस उद्योगाला सध्या आर्थिक अडचणीचे दिवस आले असताना पुणेकरांनी सर्कसला नेहमीच भरघोस प्रतिसाद दिला आहे, हे महत्त्वाचे आहे, असे ऑलिम्पियन सर्कसचे मालक जॉन मॅथ्यू यांनी सांगितले की, शहरांमध्ये मध्यवर्ती भागात कमी भाड्यात मैदाने उपलब्ध होत नाहीत. वीजपुरवठा अखंडित राहावा, यासाठी संपूर्ण शोला जनरेटरमार्फत वीजपुरवठा केला जातो. डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे खर्चात अधिक भर पडली आहे. प्रवास, नाष्टा-जेवण, आरोग्य हे सारेच खर्च वाढले आहेत. शिवाय सर्कसला शासकीय मदत नाही. सर्कसला लोकाश्रय खूप आहे, मात्र राजाश्रय नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. सर्कस अडचणीत असतानाही अपंग, अनाथ यांना आम्ही सर्कस मोफत दाखवतो व सामाजिक जबाबदारी पार पाडतो, असे सांगून अधिकाधिक लोकांनी कुटुंबीयांसमवेत आवर्जून सर्कस बघावी, असे आवाहन त्यांनी केले. ७ जानेवारी २०२४ पर्यंत सर्कसचा मुक्काम पुण्यात असणार आहे. 



Post a Comment

Previous Post Next Post