गर्दीचा फायदा घेऊन मध्यवर्ती बस स्टॉप परिसरात चोरी करणारयांना अटक .

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर - गर्दीचा फायदा घेऊन मध्यवर्ती बस स्टॉप परिसरात चोरी करण्यारयांना पकडून त्यांच्या कडील सोन्याच्या दागिन्यासह 7 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने अमोल सुरेश तिंडगे आणि धनपाल जयंतीभाई इंदेकर या दोघांना अटक केली.

अधिक माहिती अशी की,25/11/23 रोजी अनुराधा गजानन वाशीकर या मध्यवर्ती बस स्टॉप परिसरात केमटी बस मध्ये चढताना त्यांच्या  सोन्याच्या पाटल्या चोरीस गेल्या होत्या.याची फिर्याद शाहुपुरी पोलिस ठाण्यात दिली होती.या गुन्हयाचा तपास करीत असताना पोलिस रेकॉर्ड वरील अमोल तिंडगे यांनी आपल्या सहकारयां मार्फत हा गुन्हा केल्याची माहिती .हे दोघे गारगोटी हूं कोल्हापूरच्या दिशेने कारने येत असल्याची माहिती मिळाली असता या पथकाने कात्यायनी परिसरात सापळा रचून ताब्यात घेऊन अंगझडतीत सोन्याचे दागिने सापडले.

अधिक चौकशीत चोरी केल्याची कबुली दिलयाने चोरीतील दागिने आणि   इंडिका कार जप्त करण्यात येऊन पुढ़ील तपासाठी शाहुपुरी पोलिसांच्या स्वाधीन केले.ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस उपनिरीक्षक विनायक सपाटे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post