आंतरवासिता प्रात्यक्षिकांतर्गत गट क्रमांक दोन "अंबप गर्ल्स हायस्कूल, अंबप". येथे दोन महिन्यांची आंतरवासिता संपन्न झाली

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप, संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड्.) पेठ वडगाव येथे बी. एड्. व्दितीय वर्षातील सेमीस्टर 3 मधील शालेय आंतरवासिता प्रात्यक्षिकांतर्गत गट क्रमांक दोन "अंबप गर्ल्स हायस्कूल, अंबप". येथे दोन महिन्यांची आंतरवासिता संपन्न झाली. ही आंतरवासिता दिनांक 03/10/2023 पासून सुरू करण्यात आली होती. 

या आंतरवासितेदरम्यान छात्राध्यापकांनी अध्ययनाबरोबर वेगवेगळे उपक्रम राबविले. यामध्ये  मातीकाम, नशामुक्त भारत अभियान, रांगोळी स्पर्धा, पारंपरिक वेशभूषा स्पर्धा, वृक्षारोपण, जागतिक हात धुवा दिन, स्वच्छता मोहीम, कवायत प्रकार ,टपाल दिन, आरोग्य केंद्राला भेट, वाचन प्रेरणा दिन, वाचनालय भेट, ग्रामपंचायत भेट, क्रीडा स्पर्धा,दांडिया, लेझीम, पथनाट्य, व्याख्यान, टाकाऊ पासून टिकाऊ, निर्भया पथक भेट, रक्तगट तपासणी शिबिर, चित्रकला स्पर्धा यासारखे उपक्रम राबविले . गुरुवार दिनांक 30/11/2023 रोजी आंतरवासितेचा सांगता समारंभ संपन्न झाला.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सौ.सुषमा पाटील मॅडम, जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित राजाराम कॉलेज कोल्हापूर .तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या सौ. निर्मळे आर.एल. ,  सौ.मांगलेकर एस.ए. मुख्याध्यापिका अंबप गर्ल्स हायस्कूल अंबप.प्रा.सौ. जाधव व्ही.एस.उपमुख्याध्यापिका अंबप गर्ल्स हायस्कूल अंबप.,प्रा. शिरतोडे व्ही.एल., उपस्थित होते. इतर उपस्थितीमध्ये विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आंतरवासिता गटातील छात्राध्यापक,छात्राध्यापिका,  विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. या गटाची शालेय आंतरवासिता हे प्रात्यक्षिक प्रा. सौ.सावंत ए.पी. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक छात्राध्यापिका उषादेवी कुंभार तसेच पाहुण्यांची ओळख छात्राध्यापिका सारिका माने यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्राध्यापिका सारिका माने व श्री तेजस्वी खाडे यांनी केले. आंतरवासितेदरम्यान घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच शाळेतील शिक्षकांनीही मनोगत व्यक्त केले.त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे सुषमा पाटील मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.त्यांनी सांगितले विद्यार्थ्यांनी आपल्यातले गुण ओळखावे . ज्यात आवड आहे त्याचं शिक्षण घ्यावं . 

आई वडिलांचा आदर, परिस्थितीची जाणीव व वाचानाप्रती प्रेम या मुद्यांचा सखोल उहापोह केला.शिक्षक हा पेशा नसून एक जबाबदारी आहे याची जाणीव करून दिली. छात्रध्यापकानी उत्तम शिक्षक व्हावं अशा शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ.सौ. निर्मळे मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले .त्यांनी सांगितले की ,आपल्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास वाढवला पाहिजे. नवीन गोष्टी शिकण्यावर भर दिला पाहिजे. आंतरवासितेमधील  छात्रमुख्याध्यापिका दिव्या माने, उषा देवी कुंभार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या शेवटी छात्राध्यापिका अंकिता निरूखे यांनी आभार मानले . अशाप्रकारे ही दोन महिन्यांची आंतरवासिता टप्पा क्रमांक दोन अगदी व्यवस्थितरीत्या पार पडली.

Post a Comment

Previous Post Next Post