प्रबोधन वाचनालयाला छात्रशिक्षक व विद्यार्थ्यांची भेट

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन वाचनालयाला इचलकरंजी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या शिक्षकांनी आंतरवासिता टप्पा क्र.२ अंतर्गत भारतमाता विद्या मंदिर क्र.३३ या शाळेच्या विद्यार्थी - विद्यार्थिनींसह भेट दिली. तसेच वाचनालयातील पुस्तके नियतकालिके आणि एकूणच कामकाजाची माहिती घेतली. 

प्रारंभी प्रसाद कुलकर्णी यांनी ग्रंथभेट देऊन स्वागत केले.तर वाचनालयाची माहिती सौदामिनी कुलकर्णी, नंदा हालभावी, अश्विनी कोळी यांनी दिली. यावेळी भारत माता विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका मुजावर आणि शिक्षक चव्हाण व डाकरे उपस्थित होते तर छात्रशिक्षिका वर्षा कोठावळे, रूकैय्या शेख,शोभा चव्हाण, पूजा शिंदे, पूजा माळगे, कोमल पाटील ,प्रतिज्ञा माने, प्रियंका पाटील ,नूतन भरमगोंडा, पूजा निंबाळकर ,नम्रता बरगाले ,नीलम चौगुले ,प्रतीक्षा मगदूम आणि छात्र शिक्षण विजय कुंभार यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. वर्षा कोठावळे यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post