महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांचेकडून स्वच्छतेची तसेच पंचगंगा नदी पात्रातील जलपर्णी काढणेच्या कामाची पाहणी

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

     इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छता विषयक तक्रारी निदर्शनास येत असल्याने आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी आज बुधवार दि. २८ डिसेंबर रोजी शहरातील वॉर्ड क्रमांक १,२ आणि ३ मध्ये सकाळी अचानक फिरती करून आरोग्य विभागाच्या स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली. आरोग्य सुविधा हि मुलभूत सुविधा असल्याने तसेच स्वच्छता हा घटक अत्यंत महत्त्वाचा असलेने शहरातील स्वच्छतेबाबत दक्षता घेणेचे सक्त आदेश दिले होते तसेच आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत आरोग्य अधिकारी तसेच सर्व स्वच्छता निरीक्षक, मुकादम यांना शहरातील स्वच्छतेच्या कामाबाबतीत कुचराई केल्यास संबंधितांवर कारवाई करणेचे सुद्धा  आदेश दिले होते.

         


   या अनुषंगाने आजच्या फिरती दरम्यान ज्या ठिकाणी अस्वच्छता आढळून आली त्या प्रभागातील संबंधित स्वच्छता निरीक्षक आणि आरोग्य कर्मचारी यांचेवर कारवाई करणेचे तसेच पाहणी दरम्यान जे सफाई कर्मचारी नेमुन दिलेल्या  हद्दीवर गैरहजर होते त्यांचे आजच्या एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश आस्थापणा विभागास दिले.

   याचबरोबर पंचगंगा नदी पात्रातील जलपर्णी काढणेच्या कामाची सुरुवात आज कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करणेत आली होती त्या ठिकाणी सुद्धा आयुक्त यांनी भेट देऊन पाहणी केली आणि आवश्यक त्या सुचना दिल्या.

        पाहणी दरम्यान मा.आयुक्त यांनी नागरिकांशीसंवाद साधुन स्वच्छता विषयक समस्या जाणून घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

       याप्रसंगी सहा.क्रीडा अधिकारी संजय कांबळे, स्वच्छता निरीक्षक विजय पाटील, सुरज माळगे यांचेसह आरोग्य विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते.



         

Post a Comment

Previous Post Next Post