राजकीय पुढाऱ्यांनी पुढाकार घेऊन तोडगा काढावा, नागरिकांचे मत...

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

संदीप कोले  : प्रतिनिधी  

कोल्हापूर ते कोकण यांला जोडणारा नागपूर ते रत्नागिरी या रस्त्याचे भूसंपादक होऊन रस्त्याचे काम सुरू झाले आहे. या मार्गावरील कोल्हापूर ते रत्नागिरी या टप्प्यात 49 गावातून हा रस्ता जात आहे यात 24 गावे शाहूवाडी तालुक्यातील आहेत. पन्हाळ्यातील 11 .करवीर मधील 8 हातकणंगले मधील 6 गावे आहेत.

 यामध्ये नागाव, टोप ,वडगाव, हेरले, माले, चोकाक या गावाचा समावेश आहे पण या गावातून डोंगरा भागाकडे मोठ्या प्रमाणात शेती आहे ,हेरले गावातून पंचगंगा नदी दक्षिण दिशेला असून उत्तर दिशेला डोंगरा भाग आहे तिथून मोठ्या प्रमाणात पाईपलाईन द्वारे पाणी डोंगराकडे शेतीसाठी नेण्यात आले आहे. तसेच ह्या डोंगराळ भागा कडे जाण्यासाठी हेरले गावातून आठ ते नऊ रस्ते आहेत. झाडी टेक कडे जाणारा रस्ता. मुल्ला भट्टीकी जाणाऱ्या रस्ता. परमाज रानाकडे जाणारा रस्ता. छत्रुप्याचा ओढा ते हानबर हुडा कडे जाणारा रस्ता.रगारमळा. म्हसोबा पांदन. वाडी वगळ रस्ता पेंढारकीकडे जाणारा रस्ता .या रस्त्यावर रोज शेतकऱ्यांची आवाजही चालू असते या रस्त्यांना कोणताही भुयारी मार्ग नसल्याने शेतकऱ्यांची व ऊस वाहतूक दार वाहतुकांचे ताराबळ उडत आहे. शेतकरी आता हातबल झाले आहेत 


या रस्त्यावर भुयारी मार्ग करण्यासाठी आमदार आणि खासदार यांनी लक्ष घालण्याची गरज आहे पण आमदार खासदार व गावातील कार्यकर्ते मात्र त्यांच्या जाहिराती करण्यात व्यस्त आहेत लाखोंचे काम केलेले जाहिरात करतात पण जिथे शेतकऱ्यांचे गरज आहे तिथे मात्र काही नाही. या कार्यकर्त्यांची शेती डोंगराकडील रस्त्यालगत नाही का असा सवाल उपस्थित केला जात आहे. याकडे राजकीय नेते पुढारी यांनी लवकरात लवकर लक्ष घालून याचा तोडगा काढावा अशी मागणी होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post